प्रेग्नेंट झाली तर DNA टेस्टनेच ठरवणार बाप! एकाच वेळी जुळ्या भावांना डेट करणारी तरुणी कोण?

जर मी प्रेग्नेंट राहिले तर मी डीएनएद्वारे त्याच्या वडिलांचा शोध घेईन. दोन सख्या भावांना डेट करणाऱ्या मुलीच्या विधानाने सर्वत्र एकच खळबळ. नेमकं काय घडलं?

प्रेग्नेंट झाली तर DNA टेस्टनेच ठरवणार बाप! एकाच वेळी जुळ्या भावांना डेट करणारी तरुणी कोण?
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 27, 2026 | 11:09 AM

Dating With Twin Brothers: जगभरात सध्या अशा काही घटना घडत आहेत, त्यावर विश्वास देखील ठेवणे कठीण होत चाललं आहे. अशातच एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. थायलंडमधील नाखोन फानोम प्रांतातून समोर आलेली एक घटना आहे. सध्या या घटनेची जगभरात चर्चा सुरु आहे. ज्यामध्ये 24 वर्षीय फाह नावाची तरुणी एकाच वेळी सुआ आणि सिंग या जुळ्या भावांसोबत नात्यात असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे, हे तिघंही बऱ्याच दिवसांपासून एकत्र राहत होते. या अनोख्या नात्याला दोन्ही कुटुंबांचीही संमती मिळाल्याचं समोर आलं आहे.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, फाह आणि हे दोन्ही जुळे भाऊ नात्याच्या सुरुवातीपासूनच एकत्र राहत असून फाहचं म्हणणं आहे की त्यांच्या नात्यात कोणतेही ठरावीक नियम नव्हते. परस्पर समज, विश्वास आणि सोयीच्या आधारे हे नातं पुढे चालत होतं. घरातील कामे, जबाबदाऱ्या आणि दैनंदिन खर्च तिघेही मिळून सांभाळत होते.

आर्थिक जबाबदारी एकत्र, नियोजन फाहकडे

फाह एका रेस्टॉरंटमध्ये काम करत असून तिला महिन्याला सुमारे 20 ते 30 हजार रुपयांपर्यंत पगार मिळत होता. सुआ आणि सिंग हे दोघेही कृषी यंत्रसामग्रीशी संबंधित व्यवसायात करत आहेत. विशेष बाब म्हणजे, दोन्ही भाऊ आपली संपूर्ण कमाई फाहकडे देत आहेत. घराचा खर्च, बचत आणि आर्थिक नियोजनाची जबाबदारी फाहच सांभाळत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गर्भधारणेच्या मुद्द्यावरही स्पष्ट भूमिका

या नात्याबाबत सर्वाधिक चर्चा फाहच्या एका वक्तव्यामुळे होत आहे. तिनं स्पष्ट केलं आहे की भविष्यात ती गर्भवती राहिल्यास, मुलाच्या वडिलांची ओळख निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येईल. जन्म प्रमाणपत्रावर योग्य नाव असणं आवश्यक असल्याचं तिचं म्हणणं आहे. मात्र, भावनिक नात्याच्या दृष्टीने मूलाने दोन्ही भावांना ‘पप्पा’ म्हणून हाक मारावी अशी तिची इच्छा आहे.

थायलंडमध्ये कायद्यानुसार एकविवाह मान्य आहे. मात्र, एकापेक्षा अधिक व्यक्तींना डेट करणं कायद्याने गुन्हा मानलं जात नाही. त्यामुळे फाह, सुआ आणि सिंग यांचं नातं कायदेशीर अडचणीत येत नसले तरी समाजात यावर नव्या प्रकारची चर्चा सुरू झाली आहे.

काही जण या नात्याला अजब म्हणत आहेत तर काही जण याला बदलत्या काळातील धाडसी पाऊल मानत आहेत. एकूणच, फाह आणि जुळ्या भावांची ही कथा आधुनिक समाजात नातेसंबंधांच्या बदलत्या व्याख्येकडे लक्ष वेधत घेत आहे.