समुद्रकिनारी फिरायला गेली आणि नशीब चमकलं, रातोरात झाली कोट्यधीश ! तुम्हालाही ती वस्तू सापडली तर…

समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या महिलेला एक अशी गोष्ट सापडली, ज्यामुळे तिचं नशीब उजळलं. एका गोष्टीमुळे ती रातोरात कपोडपती बनली. नेमकं काय होतं ते ?

समुद्रकिनारी फिरायला गेली आणि नशीब चमकलं, रातोरात झाली कोट्यधीश ! तुम्हालाही ती वस्तू सापडली तर...
किनाऱ्याजवळ सापडलेल्या एका गोष्टीने महिलेचं चमकलं नशीब
Image Credit source: social media
| Updated on: Nov 08, 2025 | 1:44 PM

माणसाचं नशीब कधी पलटू शकतं. कधी तुमची किस्मत चमकेल, रातोरात पैशांची बरसात होईल काहीच सांगता येत नाही. असंच काहीस थायलंडमधील (Thailand) एका महिलेसोबत घडलं. तेथील येथे, नाखोन सी थम्मरतच्या किनाऱ्यावर (Coast Of Nakhon Si Thammarat) फरताना चालत असताना, एका महिलेला तेथील वाळूत अशी एक गोष्ट सापडली त्यामुळे ती एका रात्रीत करोडपती झाली. वाचून आश्चर्य वाटलं ना, चला जाणून घेऊया त्या महिलेला असं नेमक काय सापडलं ते..

49 वर्षाची सिरीपोर्न नुमरिन ही महिला समुद्रकिनाऱ्यावर चालत असताना तिला एक विचित्र गाठ दिसली. नुमरिनला माशाचा वास येऊ लागला. ते पाहून तिला वाटलं की ते उपयोगी ठरू शकते. म्हणून तिने ती घरी आणली. त्यानंतर तिने त्याच्या शेजाऱ्यांना त्या विचित्र वस्तूची ओळख पटवण्यास सांगितले. ते पाहून तिच्या शेजारच्या व्यक्तीने तिला सांगितलं की खरंतर ती गाठकिंवा ती गोष्ट म्हणजे व्हेलची उलटी होती, ज्याला एंबरग्रीस असेही म्हणतात.

व्हेलच्या उलटीला कोट्यवधींची किंमत

हे ऐकून नुमरिनला आश्चर्य वाटले. नंतर तिला कळलं की आंतरराष्ट्रीय बाजारात व्हेलच्या उलटीला खूप जास्त किंमत मिळते. तिला सापडलेली व्हेलची उलटी 12 इंच रुंद आणि 24 इंच लांब होती. बाजारभावानुसार, त्याची किंमत अंदाजे 1,86,000 पौंड किंवा अंदाजे 1.8 कोटी रुपये इतकी आहे.

व्हेलची उलटी किंवा अंबरग्रीस, स्पर्म व्हेलच्या शरीरात तयार होते. ते परफ्यूममध्ये देखील वापरले जाते. ते फिक्सेटिव्ह म्हणून काम करते, ज्यामुळे सुगंधांना दीर्घकाळ टिकणारा प्रभाव मिळतो. जर तुम्हालाही व्हेल माशाची उलटी आढळली आणि तुम्हाला त्याची तपासणी करायची असेल तर तुम्ही ती एका विशिष्ट प्रकारे करू शकता. त्याचा एक भाग आगीवर ठेवा. जर ते वितळले आणि पुन्हा कडक झाले तर ते खरोखर व्हेल वॉमट किंवा अंबरग्रीस आहे. न्यूमरिननेही अशीच एक चाचणी केली आणि ती यशस्वी झाली.

आता तज्ञ तिच्या घरी येण्याची ती वाट पाहत आहे. जेणेकरून ते अंबरग्रीसची सत्यता देखील तपासू शकतील. मी खूप भाग्यवान आहे की मला एम्बर्ग्रिसचा इतका मोठा तुकडा सापडला असं व्हेलच्या मौल्यवान उलट्या सापडल्यानंतर न्यूमरिन म्हणाली. त्याचे मला चांगले पैसे मिळतील अशी मला आशा आहे, सध्य मी ते माझ्या घरात सुरक्षित रित्या ठेवलं आहे, असं तिने नमूद केलं.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)