भारतातील ती नदी, जिथे पाण्यापेक्षा अधिक वाहते रक्त! खडकही झाला लाल, खरंच काय चमत्कार, Video पाहिला का?

Damodar Blood River : भारताची ही नदी सध्या चर्चेत आहे. या नदीत पाणी कमी आणि लाल पाणी जास्त वाहते. त्यामुळे या नदीत पाणी कमी आणि रक्त अधिक असा हा प्रकार आहे. काय आहे यामागे कारण? काय आहे हे रहस्य?

भारतातील ती नदी, जिथे पाण्यापेक्षा अधिक वाहते रक्त! खडकही झाला लाल, खरंच काय चमत्कार, Video पाहिला का?
लाल रंगाची नदी
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 05, 2025 | 4:31 PM

भारतातील काही नद्यांमध्ये काही ना काही रहस्य आहेच. त्यात झारखंडमधील रजरप्पा मंदिराजवळील दामोदर नदी सर्वात खास आहे. समाज माध्यमावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये नदीतील पाणी लाल रंगाचे दिसत आहे. इतकेच नाही तर येथील खडकाचा रंग सुद्धा लाल झालेला आहे. हा नजाराच इतका भयंकर असतो की, लोक हे लाल पाणी पाहून दचकतात. खडकाचा रंग लालले लाल दिसत असल्याने अनेकांना धक्का बसतो. काही जण याला छिन्नमस्ता मंदिराचा चमत्कार मानतात. एका तरुणाने याविषयीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे या नदीत पाण्यापेक्षा रक्त अधिक वाहत असल्याचे दिसून येते. काय आहे या पाण्याचे सत्य? काय आहे यामागील रहस्य?

मानवी कृत्याचा परिणाम?

इन्स्टाग्रामवरील शेअर केलेल्या या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. त्यानुसार, दामोदर नदीचे पाणी सामान्य दिसत नाही, ते गडद लाल रंगाचे दिसते. या नदीचे काठ, खडक सुद्धा लाल झालेले दिसतात. हे दृश्य एखाद्या भयावह चित्रपटातील दृश्यासारखे दिसतात. या व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, या नदीत पाण्यापेक्षा जास्त रक्त वाहत असल्याचे दिसते. अर्थात हे लाल पाणी आहे. त्यामागे काही कारण आहे. त्यामागील कारण काही औरच आहे. रजरप्पा मंदिरात प्रत्येक दिवशी बकऱ्यांचा बळी देण्यात येतो. मंदिरात सतत हे बळी देण्यात येत असल्याने रक्त या पाण्यात मिसळते. खडकावर सुद्धा हे रक्त दिसते.

ही नदी रक्ताने लाल झाली

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत या नदीत रक्त वाहत असल्याचे स्पष्ट दिसते. एका युझर्सने त्यावर ही नदी रक्ताने लाल झाल्याचे कॅप्शन लिहिले आहे. तर काही जण हा देवी छिन्नमस्ताचा प्रकोप असल्याचे म्हणत आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्युज आणि कमेंट्स आहेत. काही युझर्सने हा धार्मिक चमत्कार असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी बोकडांचा बळी दिल्या जात असल्याने त्याचे रक्त या पाण्यात मिसळल्याचा दावा केला आहे. हा देवीचा प्रकोप नाही तर मानवी चूक असल्याचे काही युझर्स म्हणत आहेत. तर काही जण येथील खडकच लाल रंगचा असल्याने तसा रंग दिसत असल्याचे म्हणत आहे. पण खरे तर येथ सतत बोकडाचा बळी जातो आणि त्यांचे रक्त नदी पात्रात वाहत येते. त्यामुळे ते पाणी दूषित तर झालेच आहे. पण खडक सुद्धा लाल झाले आहेत.