Viral: गौर से देखिए इस लडके को! लहानपणी नाकात अडकलेलं नाणं, दहावर्षानंतर शिंकल्यावर बाहेर पडलं…

| Updated on: Jun 30, 2022 | 3:54 PM

चार वर्षाचा असताना एका मुलाच्या नाकात नाणं अडकले होते. दक्षिण लंडनमध्ये राहणारा हा मुलगा आता 14 वर्षांचा असून त्याला आलेल्या जोरदार शिंकेतून हे दहावर्षीपूर्वी अडलेले नाणं आता बाहेर पडले आहे.

Viral: गौर से देखिए इस लडके को! लहानपणी नाकात अडकलेलं नाणं, दहावर्षानंतर शिंकल्यावर बाहेर पडलं...
गौर से देखिए इस लडके को!
Image Credit source: Social Media
Follow us on

दक्षिण लंडन मध्ये वास्तव्यास असणारा मुलगा अवघ्या चार वर्षांचा असतांनाच त्याच्या नाकात नाणं अडकले (The coin stuck in nose) हेाते. ते, नाणं तसेच दहा वर्षे त्याच्या नाकात अडकून राहिले. आपल्या नाकात नाणं आडकुन राहिल्याचे त्यालाही निट आठवत नव्हते. एकदा अशीच शिंक (Sneeze) आली अन्‌ त्या सोबत ते, नाणं नाकातून बाहेर पडले. दहावर्षापासून नाकात नाणं अडकलेल्या अवस्थेत होते. आता ते बाहेरं पडल्याने, त्याला बरं वाटत आहे. लंडन मधील उमर कमर या चौदा वर्षाच्या या मुलाची ही गोष्ट आहे. उमर कमर दक्षिण लंडनमध्ये (In south London) राहतो. लहानपणी खेळतांना त्याच्या नाकात नाणे अडकले होते. नाणे अडकल्याची घटना तो विसरला होता. नाकाला जखम झाल्याने, तो अनेकवेळा डॉक्टरांकडे गेला, पण नाणे अडकल्याचे डॉक्टरांनाही कळू शकले नाही.

कसे आले नाणं बाहेर

वैद्यकीय रिपोर्टनुसार, उमर कमर याच्या नाकात या अडलेल्या नाण्यामुळे, नेहमीच वेदना होत होत्या. परंतु, एक दिवसं त्याचे नाक नेहमीपेक्षा जास्तच दुखत होते. त्यामुळे नाकात काही अडकले तर नसावे अशी शंका येऊन त्याने, स्वतः च एक प्रयोग केला. उमर ने, दोन्ही कानात कापूस घातला. त्याने डाव्या नाकपुडीतून श्वास घेणे थांबवले आणि उजव्या नाकपुडीतून श्वास सोडला. इतक्यात उमरला जोरदार शिंक आली अन्‌ नाणं बाहेर आले.

आईलाही विश्वास बसत नव्हता

त्याची आई नफसीनने सांगितले की, तो सुमारे 15 मिनिटांनी खाली आला, तो काही वेळ उभा राहिला. मग तो, म्हणाला की नाणं बाहेर आले आहे. यावर आईने विचारले, तू ठिक आहेस ना? त्याची आई म्हणाली की, लहानपणी नाणं अडकल्याचे तिलाही माहित नाही आणि आता यावर विश्वास बसत नाही, की हे नाणं तब्बल दहा वर्ष मुलाच्या नाकात च अडकून होते.
‘द सन’च्या वृत्तानुसार, लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटलच्या प्रोफेसर क्लेअर हॉपकिन्स म्हणाल्या, “लहान मुलांना नाकात काहीतरी घालण्याची सवय असते. अशा स्थितीत ते छोटे नाणे नाकाच्या आत गेले असावे. लहान मुलांना नेमके काय झालं ते पालकांना सांगता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना नंतर समोर येतात.

हे सुद्धा वाचा