VIDEO | कुत्रा कॅमेऱ्याकडे बघत पोज देतोय, विचित्र हसणे पाहून लोकं घाबरली

DOG VIRAL VIDEO | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे कुत्रा कॅमेरा पाहिल्यानंतर पोज देत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकं घाबरली आहेत.

VIDEO | कुत्रा कॅमेऱ्याकडे बघत पोज देतोय, विचित्र हसणे पाहून लोकं घाबरली
DOG VIRAL VIDEO
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 18, 2023 | 9:21 AM

मुंबई : सोशल मीडियाच्या (Social media) विविध प्लॅटफॉर्मवरती काही मजेशीर व्हिडीओ (viral video) नेहमी पाहायला मिळतात. त्यामध्ये काही मजेशीर व्हिडीओ सुध्दा असतात. कुत्र्यांचे व्हिडीओ (dog viral video) पाहायला लोकांना अधिक आवडतात. सध्या एका कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो कुत्रा एका कॅमऱ्याकडे पाहून पोज देत आहेत. काही लोकांनी ती पोज मजेशीर वाटत आहे. तर काही लोकांना ती पोज घाबरवत आहे. अनेकांना कुत्रा हा प्राणी अधिक आवडतो. त्यामुळं त्याची काळजी खूपजण घेतात. लोकं किती काळजी घेतात, त्याचे सुध्दा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत.

हा व्हिडीओ Reddit यांनी शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक कुत्रा आपले दात बाहेर काढतं आहे. त्यानंतर कॅमेरा समोर आल्यानंतर हसत आहे. त्या व्हिडीओला त्या कुत्र्याने अधिक मजेशीर सु्द्धा केले आहे. त्या कुत्र्याने एक छोटी काठी पकडली. त्या काठीला तो दाताने दाबत आहे.

दोन दिवसापूर्वी शेअर केलेल्या व्हिडीओला आतापर्यंत 5,700 अपवोट मिळाले आहेत. त्याचबरोबर त्या व्हिडीओ अधिक कमेंट सुध्दा आल्या आहेत. काही लोकांना हा व्हिडीओ अधिक आवडला आहे. तरी काही लोकांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भीती वाटत आहे. काही लोकं अशी सुध्दा म्हणाली, त्या व्हिडीओला जे म्युझिक लावलं आहे, त्याचा आम्ही तिरस्कार करतो.

Hhhh??
by u/mujohnt in AnimalsBeingDerps

एका Reddit युझरने कमेंट केली आहे की, “साउंडट्रॅकची पर्वा न करता मला ते लिल डर्क आवडते” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे की, हा व्हिडीओ थोडा मजेदार आणि परेशान करणारा आहे. तिसरा नेटकरी म्हणतो, तो कॅमेऱ्यात चांगला दिसण्याचा प्रयत्न करीत आहे. चौथा नेटकरी म्हणतोय की, सगळं ठीक आहे, पण थोडसं घाबरायला होतं.”