Surya Grahan 2022 : ग्रहण सुरू असताना सूर्य अस्ताला जाणारे पहिलेच सूर्यग्रहण; भारतात 1300 वर्षांनंतर… 

| Updated on: Oct 25, 2022 | 2:24 PM

अस्ताला जाणारे पहिलेच सूर्यग्रहण आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या ग्रहणाकडे लागले आहे.

Surya Grahan 2022 : ग्रहण सुरू असताना सूर्य अस्ताला जाणारे पहिलेच सूर्यग्रहण; भारतात 1300 वर्षांनंतर... 
Follow us on

मुंबई : आजचे सूर्यग्रहण हे खगोलीय जगासाठी एक महत्त्वाची घटना मानली जात आहे. 2022 सालातील शेवटचे सूर्यग्रहण आहे. थोड्याच वेळात हे ग्रहण सुरु होणार आहे. भारतात 1300 वर्षांनंतर असे सूर्यग्रहण पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ग्रहण सुरू असताना सूर्य अस्ताला जाणारे पहिलेच सूर्यग्रहण आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या ग्रहणाकडे लागले आहे. भारतात अनेक ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे.

25 ऑक्टोबर रोजी दुपारी 04:23 पासून सूर्यग्रहण सुरू होणार आहे. सायंकाळी 06:25 पर्यंत हे ग्रहण राहील. ग्रहणाची मध्य वेळ 05:28 वाजता असेल आणि मोक्ष 06:25 वाजता होणार आहे. हे ग्रहण सुमारे 04 तास 03 मिनिटे चालणार आहे. संध्याकाळी 6.32 वाजता ग्रहण  संपणारआहे.

पुढील दहा वर्षात अशा प्रकारचे सूर्यग्रहण पाहायला मिळणार नाही. मागच्या 40 वर्षात अशी चार सुर्यग्रहणे झाली. मात्र सूर्यग्रहण सुरू असताना सूर्य अस्ताला जाणे या स्वरूपाचं हे मागच्या 70 वर्षातले पाहिले सूर्यग्रहण असल्याचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

हे सूर्यग्रहण सुरू झाल्यानंतर काही वेळ उघड्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. मात्र सूर्य अस्ताला जात असताना हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद शहरांमध्ये ग्रहण पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

यापूर्वी 24 ऑक्टोबर 1995 रोजी दिवाळीच्या दिवशी सूर्यग्रहण झाले होते. यानंतर आता तसाच योग पहायला मिळाला आहे.
भारतात सूर्याचे (Sun) बिंब धूसर होईल. भारतीयांना 43 टक्के सूर्याचा भाग दिसू शकेल. सूर्य आपल्या कक्षेत भ्रमण करत असतो.

जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्यभागी चंद्र येतो. तेव्हा आपल्याला सूर्य दिसू शकत नाही या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. भारतात यापुढील सूर्यग्रहण 2 ऑगस्ट 2027 रोजी दिसेल. हे पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे.