VIDEO | समुद्रात मासेमारी करणाऱ्या व्यक्तीचा हात माशाने चावला, तो व्हिवळत होता, पाहा व्हिडीओत

VIDEO | मासेमारी करणाऱ्या व्यक्तीचा हात मासा चावतोय, वेदनेने व्हिवळतोय, व्हायरल व्हिडीओ पाहून लोकं म्हणतात...

VIDEO | समुद्रात मासेमारी करणाऱ्या व्यक्तीचा हात माशाने चावला, तो व्हिवळत होता, पाहा व्हिडीओत
Fish Attack Man In Sea
Image Credit source: twitter
| Updated on: Jan 09, 2023 | 10:36 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ (Viral video) चांगलाच व्हायरल झाला आहे. एका मासेमारी करणाऱ्या व्यक्तीच्या (Fish Attack Man In Sea) हाताला माशाने कडाडून चावा घेतला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून अनेकजण कमेंट करत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी त्या व्यक्तीला सल्ला देखील दिला आहे. रोज नवे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर हा व्हिडीओ फिरत आहे.

नेमकं व्हिडीओत काय आहे

हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे, याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. मासेमारी करण्यासाठी काही व्यक्ती एका पुलावर उभे आहेत. त्यावेळी एका मासेमाऱ्याने समुद्रात मासा पकडण्यासाठी जाळं फेकलं आहे. अचानक एक मासा येतो आणि त्या व्यक्तीच्या हाताला कडाडून चावा घेतो. विशेष म्हणजे मासा इतक्या जोरात चावा घेत आहे, की मासेमारी करणारा वेदनेने व्हिवळतोय. शेजारी असलेली दोन लोकं मदतीला येतात त्यानंतरही तो मासा हात सोडत नाही. मासा पाण्यातून बाहेर आला, परंतु मासेमारी करणाऱ्याचा हात सोडला नाही. हे सगळं तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळणार आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ 30 सेकंदाचा आहे. मासेमारी करणारा त्या माशापासून सुटण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु मासा त्याचा हात सोडायला तयार नाही. @weirdterrifying नेटकत्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आतापर्यंत त्या व्हिडीओला चार लोकांनी पाहिलं आहे. 11 हजारपेक्षा अधिक लोकांनी त्या व्हिडीओला लाईक केले आहे.