AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sologamy: ‘सोलोगमी’चा निर्णय घेणारी क्षमा बिंदू आपल्या निर्णयावर ठाम! नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिसाद…

हे लोकं स्वतःच्या प्रेमात इतके बुडालेले असतात कि त्यांना कशाची म्हणजे अगदी जगातल्या कुणाचीही गरज नसते. हे ऐकताना, वाचताना विश्वास बसणार नाही पण जेव्हा तुम्ही गुजरातच्या या "सोलोगमी" वर नजर टाकाल तर तुम्हाला नक्की विश्वास बसेल. "जानी...सेल्फ लव्ह में बहुत ताकत होती है!" सोलोगमी म्हणजे स्वतःशीच लग्न करणे.

Sologamy: 'सोलोगमी'चा निर्णय घेणारी क्षमा बिंदू आपल्या निर्णयावर ठाम! नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिसाद...
क्षमा बिंदू आपल्या निर्णयावर ठाम! Image Credit source: facebook
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 04, 2022 | 8:00 PM
Share

‘सेल्फ लव्ह’ (Self Love) नावाची एक गोष्ट असते. असं म्हटलं जातं कि दुसऱ्यावर प्रेम करण्याआधी स्वतःवर केलं पाहिजे. एकटंच फिरायला जाणं, एकटंच सिनेमा बघायला जाणं, हॉटेलात जाऊन खाणं हे आजच्या पिढीसाठी (Generation) खरंतर सेल्फ लव्ह! पण सेल्फ लव्ह हे आयुष्यभर पुरणारं नसतं. कधीतरी माणूस थकेलच की, कधीतरी कुणाची तरी गरज भासेलच की… अशा वेळी काय करणार? पण हे प्रश्न झाले आपले, सामान्यांचे! काही लोकं हटके (Unique) असतात. हे लोकं स्वतःच्या प्रेमात इतके बुडालेले असतात कि त्यांना कशाची म्हणजे अगदी जगातल्या कुणाचीही गरज नसते. हे ऐकताना, वाचताना विश्वास बसणार नाही पण जेव्हा तुम्ही गुजरातच्या या “सोलोगमी” वर नजर टाकाल तर तुम्हाला नक्की विश्वास बसेल. “जानी…सेल्फ लव्ह में बहुत ताकत होती है!” सोलोगमी म्हणजे स्वतःशीच लग्न करणे.

“मैं अपनी फेव्हरेट हूं!”

गोष्ट आहे गुजरातच्या क्षमा बिंदूची! क्षमा बिंदू “मैं अपनी फेव्हरेट हूं!” असं म्हणते. तिने ते सिद्ध पण केलंय बरं का! गुजरातची क्षमा11 जून २०२२ लग्न करणार आहे,तिचं लग्न सध्या चर्चेत आहे. वडोदरामध्ये राहणारी 24 वर्षीय क्षमा बिंदू स्वतःशीच लग्न करणार आहे, ज्याला सोलोगमी म्हणतात. तिच्या या लग्नात सगळे रीतीरिवाज असतील, फेऱ्यांपासून ते पारंपरिक विधींपर्यंत, सगळे. याला गुजरातचा पहिला स्वयंविवाह किंवा एकल विवाह असं म्हटलं जातंय.

‘मला कधीच लग्न करायचं नव्हतं पण…’

या सोलोगमी बद्दल क्षमा म्हणते, ‘मला कधीच लग्न करायचं नव्हतं, पण मला नवरी व्हायचं होतं.’ त्यामुळे मी स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. कदाचित माझ्या स्वत:च्या देशात मी सेल्फ लव्हचं उदाहरण देणारी पहिली मुलगी आहे.’ क्षमा एका खासगी कंपनीत काम करते. अशा प्रकारच्या विवाहाला, सोलोगमीला लोकं अमान्य करू शकतात पण स्त्रियाही महत्त्वाच्या आहेत हेच मला ह्यातून सांगायचं आहे, असंही क्षमा म्हणते.

हनीमूनला गोव्याला जाणार

क्षमा बिंदूचे आई-वडीलही आपल्या मुलीच्या या निर्णयावर खूश आहेत. त्यांचीही या लग्नास मान्यता आहे या लग्नाला आशीर्वाद दिला आहे. क्षमाने आपल्या लग्नासाठी गोत्री येथील मंदिरात पाच व्रते लिहिली आहेत. लग्नानंतर क्षमाने हनीमूनसाठी गोव्याची निवड केली आहे, इथे ती दोन आठवडे राहणार आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?