
लग्न.. दोन जीवांचं आणि कुटुंबाचं मिलन होणार हे नातं.प्रत्येकाच्या मनात आपल्या लग्नाबद्दल काही स्वप्न, इच्छा असता. असं लग्न व्हावं, हे करावं, अशा योजना प्रत्येकाने थोड्याफार प्रमाणात आखलेल्या असतातच. आजकालच्या युगात आपण जेव्हा लग्नाला जातो तेव्हा तिथली सजावट, मेहदी, हळद, संगीत, लग्न समारंभ, एवडे वेगवेगळे इव्हेंट पाहून चक्रावायला होतं. सगळ्या सजावटीचं कौतुक तर आपण करतोच, पण एवढा तामझाम केल्यावर, लग्नासाठी किती खर्च आला असेल,असा प्रश्नही आपल्या मनात येतोच ना..
जेजेव्हा तुमच्या घरात एखाद्याच्या लग्नाचा विचार सुरू असतो, तेव्हा आजच्या काळात लग्नावर किती पैसे खर्च होतात हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटत असेल. पण 30, 40 किंवा 50 वर्षांपूर्वी जेव्हा लग्नं व्हायची तेव्हा कसं वातावर असायचं, किती खर्च झाला होता, अशी आठवण कोणी सांगत, तेव्हा ते ऐकूनही आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटतं. सध्या सोशल मीडियावरही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात तब्बल साठ वर्षांपूर्वी म्हणजे 1965 साली झालेल्या लग्नाबद्दल सगळं लिहीलं आहे. तुम्हीही नक्की वाचा.
व्हायरल व्हिडीओत काय ?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, ती व्यक्ती एक जुनी डायरी दाखवतो ज्यामध्ये 1965 मधील एका लग्नाचा खर्च लिहिलेला आहे. ते लग् 10 फेब्रुवारी 1965 रोजी झालं होतं. त्या काळातील लग्नांमध्ये किती शगुन (भेटवस्तू) देण्यात आल्या, ते प्रथन त्या व्यक्तीने दाखवलं. अनेकांनी प्रत्येकी एक रुपया शगुन म्हणून दिला आणि एकूण 50 रुपये मिळाले होते.
त्यानंतर त्या इसमाने आणि स्वयंपाकी, न्हावी इत्यादींचा खर्च दाखवला. आणि शेवटी त्याने दाखवंल की त्या काळी संपूर्ण लग्न 1504 रुपये आणि 64 पैशांमध्ये झालं. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं कारण आजकाल 1500 रुपये म्हणजे, तेवढ्या पैशांत र आपण हॉटेलमध्ये एकवेळचं जेवतो.
व्हायरल व्हिडीओ पहा
तुम्ही आत्ताच पाहिलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर Ghantaa नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ‘कितने सस्ते दिन थे.’ असं व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. या व्हिडीओला 32 हजारांपेक्षा लाईक्स मिळाले असून अनेकांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. त्यावेळी पगार ५० रुपये असायचा असं एका यूजरने लिहीलं. तर दुसऱ्या युजरने गमतीत लिहिलं- अरे, कोणीतरी टाईम मशीन बनवा ना.. अनेकांना हा व्हिडीओ खूप आवडला असून बरेच जण जुन्या आठवणीत रमले आहेत.