अब्जाधीशांचा एकमेव वारसदार; तब्बल 40 हजार कोटी रुपयांची संपत्ती सोडून झाला बौद्ध भिक्षु

अब्जाधीश असणाऱ्या व्यक्तीने ही ऐश, हा आराम सोडून दिलाय. तुम्ही म्हणाल कशासाठी? बौद्ध भिक्षु बनण्यासाठी! होय. सुरवातीला ही व्यक्ती मजा म्हणून बौद्ध भिक्षु झाली. पण नंतर त्यांना खरंच हा मार्ग निवडण्याची इच्छा झाली. वय फक्त 18 वर्षे आणि करोडोंच्या मालमत्तेचा एकमेव वारसदार बनला बौद्ध भिक्षु!

अब्जाधीशांचा एकमेव वारसदार; तब्बल 40 हजार कोटी रुपयांची संपत्ती सोडून झाला बौद्ध भिक्षु
Ven Ajahn Siripanyo, The Monk
| Updated on: Jul 11, 2023 | 2:06 PM

मुंबई: विचार करा तुम्हाला बसायला आलिशान गाडी आहे. तुमच्या हाताखाली नोकर चाकर आहेत. घरातल्या कोणत्याच गोष्टीसाठी तुम्हाला काम करावं लागत नाही, सगळ्या वस्तू हातात मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इतके श्रीमंत आहात की तुमचीच पिढी काय तुमच्या नंतरच्या कित्येक पिढ्या काहीही न करता बसून खाऊ शकतात. छान वाटतंय ना विचार करून? मग आता इतकं सगळं मिळालेलं तुम्ही सोडून द्याल का हो? अब्जाधीश असणाऱ्या व्यक्तीने ही ऐश, हा आराम सोडून दिलाय. तुम्ही म्हणाल कशासाठी? बौद्ध भिक्षु बनण्यासाठी! होय. सुरवातीला ही व्यक्ती मजा म्हणून बौद्ध भिक्षु झाली. पण नंतर त्यांना खरंच हा मार्ग निवडण्याची इच्छा झाली. वय फक्त 18 वर्षे आणि करोडोंच्या मालमत्तेचा एकमेव वारसदार बनला बौद्ध भिक्षु!

आनंद कृष्णन – ज्याला एके म्हणून ओळखले जाते. भारतीय फोन कंपनी एअरसेलचे मालक होते, जे एकेकाळी प्रसिद्ध आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जचे प्रायोजक देखील होते. तमिळ वंशाच्या या टेलिकॉम टायकूनच्या घरी जन्मलेल्या वेन अजान सिरिपान्यो यांनी वयाच्या १८ व्या वर्षी बौद्ध भिक्षु व्हायचा निर्णय घेतलाय. हे घराणं दूरसंचार, माध्यमे, तेल आणि वायू, रिअल इस्टेट अशा अनेक गोष्टींचा व्यवसाय करतं. आनंद कृष्णन यांचं स्थान मलेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये आहे.

Ven Ajahn Siripanyo

सिरिपान्योने वारसा हक्काने मिळणाऱ्या सर्व संपत्तीचा त्याग करून साधू म्हणून जंगलात राहणे पसंत केले. गेल्या २० वर्षांपासून ते असं जीवन जगत आहेत. ते थायलंडमधील टाओ दम मठाचे मठाधीश आहेत. ते त्यांच्या आईच्या बाजूने थाई राजघराण्याचा वंशज असल्याचा दावाही करतात. सिरिपान्योच्या आधीच्या आयुष्याबद्दल जास्त तपशील नाही परंतु तो यूकेमध्ये त्याच्या 2 बहिणींसह वाढले आहेत, ते ८ भाषा बोलू शकतात.

ज्या माणसाने ऐशोआरामाचे जीवन सोडले ते वेन अजान सिरिपान्यो! त्यांचे वडील आनंद कृष्णन यांची संपत्ती ४०,००० कोटी रुपयांहून अधिक आहे (5 अब्ज डॉलर) आहे. वेन अजान सिरिपान्यो यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होण्याचा अधिकार सोडलाय. त्यांनी बौद्ध भिक्षु होण्याचा मार्ग निवडलाय. असं करायला साहस लागतं हेच मत लोकं व्यक्त करतायत. हे सगळं वाचू तुम्हाला काय वाटतं?