भारतातील एकमेव ट्रेन, जी एकदा सुटली की शेवटच्या स्थानकावरच थेट थांबते, पार करते 632 कमी प्रवास

भारतातील एकमेव रेल्वे जी एकदा सुटली की थेट शेवटच्या स्टेशनवरच थांबते. फक्त 7 तास 50 मिनिटांमध्ये पार करते 632 किमी अंतर. काय आहे नाव?

| Updated on: Aug 03, 2026 | 1:35 PM
1 / 5
भारतीय रेल्वे हे देशातील सर्वसामान्यांचे सर्वाधिक विश्वासार्ह आणि परवडणारे वाहतूक साधन मानले जाते. कमी खर्च, आरामदायी प्रवास आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले विस्तीर्ण रेल्वे जाळे यामुळे आजही लाखो प्रवासी रेल्वेला पहिली पसंती देतात.

भारतीय रेल्वे हे देशातील सर्वसामान्यांचे सर्वाधिक विश्वासार्ह आणि परवडणारे वाहतूक साधन मानले जाते. कमी खर्च, आरामदायी प्रवास आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले विस्तीर्ण रेल्वे जाळे यामुळे आजही लाखो प्रवासी रेल्वेला पहिली पसंती देतात.

2 / 5

विमान, बस किंवा खासगी वाहनांचे पर्याय उपलब्ध असले तरी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेच अधिक सोयीची ठरते. भारतीय रेल्वेकडे सुपरफास्ट, एक्स्प्रेस, राजधानी, वंदे भारत, इंटरसिटी आणि हमसफर अशा विविध प्रकारच्या ट्रेन आहेत.

3 / 5

यापैकी काही गाड्या आपल्या वेगवान सेवेमुळे विशेष ओळख निर्माण करतात. अशाच गाड्यांमध्ये प्रयागराज–नवी दिल्ली हमसफर एक्स्प्रेसचा समावेश होतो. या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नवी दिल्लीहून सुटल्यानंतर ती थेट प्रयागराज येथेच थांबते. या दरम्यान ती एकाही स्थानकावर थांबत नाही. त्यामुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो आणि प्रवास अधिक जलद होतो.

4 / 5

ही हमसफर एक्स्प्रेस सुमारे 632 किलोमीटरचे अंतर अवघ्या 7 तास 50 मिनिटांत पूर्ण करते. ट्रेन रात्री 10.30 वाजता नवी दिल्ली स्थानकावरून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.20 वाजता प्रयागराजला पोहोचते.

5 / 5

वेगवान सेवा, कमी प्रवासाचा कालावधी आणि नॉन-स्टॉप धावण्याच्या वैशिष्ट्यामुळे प्रयागराज–नवी दिल्ली हमसफर एक्स्प्रेस ही उत्तर भारतातील सर्वाधिक वेगवान आणि लोकप्रिय रेल्वेगाड्यांपैकी एक मानली जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us