चांदणीसोबतच लग्न करणार, हायकोर्टातच मोठा ड्रामा, हिंदूपासून मुस्लिम झालेला आयुष म्हणाला काय?
Chandni Qureshi- Ayush Malik-High Court: लव्ह जिहादचा मु्द्दा हायकोर्टातही गाजला. हिंदूपासून मुस्लिम झालेल्या आयुष्य मलिक याने चांदणी कुरेशीसोबतच आपण लग्न करणार असल्याचे म्हटले. तर त्याच्या कुटुंबाने त्याला कडाडून विरोध केला. काय आहे हे प्रकरण?

अलाहाबाद हायकोर्टात आयुष मलिक धर्मांतरण प्रकरण गाजले. लव्ह जिहादचा मुद्यावरून उत्तर प्रदेशात वाद सुरू झाला. उच्च न्यायालयाने आयुष्यला त्याच्या मतानुसार जीवन जगण्याचा अधिकार असल्याचे म्हटले. कथित धर्मांतरण प्रकरणात प्रसिद्ध औषधी व्यावसायिक देवराज मलिक आणि त्यांचा मुलगा आयुष मलिक यांना शामली पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. सुनावणीदरम्यान आयुष्यने स्पष्ट केले की, त्याने 2014 मध्ये कोणाच्याही दबावात न येता, आमिष वा धमकीला बळी न पडता, स्वतःच्या मर्जीने इस्लाम धर्म स्वीकारला. त्याला चांदणी कुरेशीसोबत लग्न करायचे आहे. पण त्याचे कुटुंबाने या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.
चांदणी आणि कुटुंबियांविरोधात धर्मांतरणाप्रकरणी गुन्हा
चांदणी कुरेशी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात मलिक कुटुंबाने कथित धर्मांतरणाप्रकरणी तक्रार दिली होती. पोलिसांनी बेकायदेशीर धर्मांतरण अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला होता. 4 जूनपासून आपल्याला ओलीस ठेवल्याचा आयुषचा आरोप होता. आयुषचा मित्र मोहम्मद सुलतान याने हायकोर्टात धाव घेत याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आयुष आणि त्याच्या वडिलांना न्यायालयात हजर करण्यात आले.
आयुष्यला पत्नी आणि धर्म निवडीचे स्वातंत्र्य
अलहाबाद हायकोर्टाने स्पष्ट केले आहे की, सज्ञान व्यक्तीला त्याच्या अंतरात्मानुसार धर्म आणि पत्नी निवडीचे स्वातंत्र आहे. पण कुटुंबाच्या दबावामुळे अथवा दडपणामुळे त्याला या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. त्याला आवडीचा जीवनसाथी निवडीचे घटनात्मक अधिका आहे. न्यायमूर्ती संदीप जैन यांच्यासमोर प्रकरणात सुनावणी झाली. निकालात आयुष्य मलिक याला त्याच्या इच्छेनुसार राहण्याचे आणि इतर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
प्रकरण तरी काय?
चार महिन्यांपूर्वी हे कथित धर्मांतरण प्रकरण समोर आले होते. आयुष्य मलिक याने अचानक धर्म बदलल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. 4 जून रोजी मंहत यशवीर महाराज यांनी हा मुद्दा उचलला होता. मलिक यांची कोट्यवधींची संपत्ती हडपण्यासाठीच चांदणी कुरेशी आणि तिच्या कुटुंबियांनी त्याचे जबरदस्ती धर्मांतरण केले आणि निकाह केल्याचा आरोप त्यांनी लावली होता. याप्रकरणी पोलिसांनी चांदणी कुरेशी हिचे वडील इस्लामसह इतर तिघांना अटक केली होती.
