‘इतक्या’ कोटींना विकली गेली जगातील सर्वात महागडी व्हिस्की! लिलाव झाला लिलाव
किंमती व्यतिरिक्त दारूची ही एक बाटली इतकी महागडी असल्याबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जगातील सर्वात महागडी व्हिस्की Yamazaki 55 (यामाझाकी 55) सध्या चर्चेत आहे. यंदा त्यातील एका बाटलीचा सुमारे साडेसहा कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला. शेवटी लिलावातून दारूची बाटली विकली गेली तर त्यात काहीतरी खास असायलाच हवं. किंमती व्यतिरिक्त दारूची ही एक बाटली इतकी महागडी असल्याबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
फोर्ब्स मासिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या व्हिस्कीची रिटेल बेस प्राइस 60 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 49 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे.
ते बनवणारी कंपनी म्हणजे बीम सनटोरी. ही बाटली साडेसहा कोटी रुपयांपर्यंत कशी पोहोचली, यामागे अनेक कारणे आहेत. त्याची किंमत कोटीच्या घरात असूनही मद्यप्रेमी त्याची चव चाखण्यासाठी आसुसलेले आहेत.
लिलावात विकली जाणारी व्हिस्कीची ही बाटली नुकतीच तुर्कीमध्ये पाहायला मिळाली. जगातील सर्वात महागडी कलाकृती, दागिने आणि सर्व चैनीच्या वस्तूंचा लिलाव करणाऱ्या सोथेबीज या कंपनीच्या वेबसाइटनुसार ही बाटली यंदा सर्वाधिक किंमतीत विकली गेलीये.
जगातील ही सर्वात महागडी व्हिस्कीची बाटली ही व्हिस्की तयार करण्यासाठी ती वर्षानुवर्षे कॅस्क (Cask) मध्ये साठवली जाते, या प्रक्रियेला एजिंग म्हणतात. या अनोख्या व्हिस्कीमध्ये असलेला स्वाद, रंग आणि पोत यासाठी हा कॅस्क(Cask) महत्त्वाची भूमिका बजावतो.
ज्या विशिष्ट प्रकारच्या कॅस्कमध्ये यामाझाकी-55 (Yamazaki 55) साठवली जाते, त्याला मिझुनारा कॅस्क म्हणतात. जे मिझुनारा वृक्षाच्या लाकडापासून बनवले जाते.
हे लाकूड अतिशय दुर्मिळ आहे. मिझुनारा कास्क तयार करण्यासाठी हे झाड किमान 200 वर्ष जुनं असणं गरजेचं असल्याचं मोठ्या दारू व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
मिझुनाराचे लाकूड इतके खास आहे की, त्यात वर्षानुवर्षे मद्य ठेवल्यानंतर त्याची चव सामान्य अमेरिकन किंवा युरोपियन लाकडापासून तयार केलेल्या कॅस्कमध्ये ठेवलेल्या वाइनपेक्षा पूर्णपणे वेगळी असते.
मीडिया रिपोर्टनुसार व्हिस्कीचा हा ब्रँड पहिल्यांदा 2020 मध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर त्यातील केवळ १०० बाटल्या लॉटरी पद्धतीने जपानी वाइन मार्केटमध्ये पोहोचल्या.
त्यानंतर पुढील वर्ष 2021 मध्ये आणखी 100 बाटल्या तयार करण्यात आल्या होत्या. अशा या मर्यादित उत्पादनामुळे त्याची किंमत नेहमीच आकाशाला भिडते.
