
ख्रिश्चन धर्मात ख्रिसमस हा त्यांचा सण 25 डिसेंबर रोजी जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आपल्या देशातही अनेक ठिकाणी या दिवशी खूप उत्साह दिसून येतो. या सणाच्या दिवशी ख्रिश्चन लोकं चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जातात, घरी पार्ट्या आयोजित करतात आणि केक कापत ख्रिसमस सण साजरा करतात. ख्रिसमसच्या दिवशी खरं तर लोक या दिवशी भेटवस्तू देतात, कारण भेटवस्तू देण्याची परंपरा प्राचीन काळापासून पाळली जात आहे. जर तुम्हालाही या ख्रिसमसला कोणतं गिफ्ट आपल्या व्यक्तींना द्यावे सुचत नसेल तर आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू देणे चांगले राहील. नाताळ हा येशू ख्रिस्तांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून, लोक प्रार्थना आणि आनंदाने साजरा करतात. घरे सजवली जातात आणि नाताळाची झाडे लावली जातात. केक कापण्यापासून ते भेटवस्तू देण्यापर्यंत, हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे.
भेटवस्तूंच्या आयडियाज
तुमच्या घरात किंवा नातेवाईकांमध्ये जर वृद्ध व्यक्तीला ख्रिसमस गिफ्ट द्याचे असतील तर तुम्ही त्यांना ‘टॉकिंग क्लॉक’ सारख्या आधार देणाऱ्या भेटवस्तू देऊ शकता. यामुळे त्यांना वेळ, तारीख इत्यादी जाणून घेणे सोपे होईल, पर्यायी म्हणून तुम्ही त्यांना सुंदर कौटुंबिक क्षणांसह एक मेमरी फ्रेम किंवा वैयक्तिकृत फोटो अल्बम देऊ शकता. ही त्यांच्यासाठी एक हृदयस्पर्शी भेट असेल. याव्यतिरिक्त, डिजिटल रेडिओ, अलेक्सा किंवा गुगल होम सारखे इंटरॅक्टिव्ह स्पीकर, फूट मसाजर, योगा मॅट्स आणि अॅक्सेसरीज, पेडल एक्सरसाइजर, रेझिस्टन्स बँड आणि डिजिटल फिटनेस ट्रॅकर बँड यासारख्या वस्तू ज्येष्ठांसाठी उत्तम आहेत.
लहान मुलांसाठी भेटवस्तू
तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना कपडे, खेळणी आणि तुमच्या आवडीच्या वस्तू भेट देऊ शकता. जर तुमचे मूलं अडीच वर्षांपेक्षा जास्त वयाचे असेल आणि शाळेत जात असेल, तर तुम्ही त्यांना DIY किट भेट देऊ शकता, जे त्यांना खेळताना शिकण्यास मदत करेल. याव्यतिरिक्त तुम्ही खेळांसह एक खेळण्यांचा स्मार्टफोन खरेदी करू शकता. संगीत खेळणी जसे की डफ/शेकर, कोडी आणि सॉर्टर टॉयज त्यांच्या विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी उत्तम आहेत. तुम्ही तुमच्या मुलासाठी कला आणि हस्तकलेसाठी कॉम्बो सेट देखील खरेदी करू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जर तुमचे मूल बऱ्याच दिवसांपासून भेटवस्तूसाठी आग्रह करत असेल, तर तुम्ही त्यांना त्यांच्या बजेटमध्ये बसणारे काहीतरी देऊ शकतात.
कपल्ससाठी भेटवस्तू
तुम्ही जर एखाद्या कपल्ससाठी भेटवस्तू खरेदी करत असाल किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देऊ इच्छित असाल, तर कपल रिंग सेटचा विचार करा. त्यांना एक सुंदर चांदी किंवा सोन्याचे ब्रेसलेट आणि अंगठी खरेदी करा. त्यांची नावे आणि फोटो असलेले वैयक्तिकृत नेकलेस आणि पेंडेंट देखील विचारात घेतले जाऊ शकतात. स्पा डे कूपन, मसाज व्हाउचर, कुकिंग, नृत्य किंवा कला वर्कशॉप व्हाउचर आणि चित्रपट, स्नॅक्स आणि मजा यांनी भरलेला डाएट-नाईट बॉक्स. कस्टम फोटो अल्बम किंवा डिजिटल फोटो फ्रेम देखील उत्तम भेटवस्तू कल्पना आहेत. DIY लव्ह नोट बॉक्स तुमच्या नात्याची कहाणी लहान तुकड्यांमध्ये सांगू शकतात. जोडप्यांसाठी गरम केलेले ब्लँकेट, सुगंधित मेणबत्ती सेट आणि वाइन अॅक्सेसरीज देखील उत्तम आहेत.