हत्तीचा क्युट व्हिडीओ बघा, दिवस चांगला जाईल!
व्हायरल क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माहुत मंदिराबाहेर बसून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत आहे.

आजकाल सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. खासकरून हत्तींशी संबंधित व्हिडीओज मोठ्या आवडीने पाहायला नेटिझन्सना आवडतं. काही दिवसांपूर्वीच रस्त्याच्या कडेला एका हत्तीणीचा गोलगप्पा खातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, जो लोकांना खूप आवडला होता. आता असाच मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये हत्ती आपल्या माहुतच्या मोबाईलमध्ये लहान मुलासारखा डोकावताना दिसत आहे. व्हायरल क्लिपमध्ये हा हत्ती मोबाइल पाहण्यासाठी जशी हालचाल करतो, त्यावर कुणालाही हसू येईल.
व्हायरल क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माहुत मंदिराबाहेर बसून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत आहे. दरम्यान, त्याच्या मागे उभा असलेला हत्ती त्याच्या फोनमध्ये लहान मुलासारखा बघण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हा हत्ती मोबाईलमध्ये बघण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे.त्याचं हे गोंडस वागणं लोकांची मनं जिंकत आहे.
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, हत्ती मोबाईल पाहण्यासाठी आपल्या शरीराला कसा झुकवतो. मग तो मोबाइल पाहण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ तुमच्या चेहऱ्यावर हसूही आणेल. चला तर मग आधी हा मजेशीर व्हिडिओ पाहूया.
View this post on Instagram
हत्ती आणि माहुतचा हा क्यूट व्हिडिओ तामिळनाडूचा आहे. क्लिपमध्ये दिसणारे मंदिर म्हणजे कुंभकोणम कुंभेश्वर मंदिर.
हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला असून लोक त्याचा खूप आनंद घेत आहेत. kerala_elephants नावाच्या अकाऊंटसोबत हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हत्ती आणि त्याचा माहुत यांचे नाते अनोखे आणि मौल्यवान आहे.’ या व्हिडीओवर नेटकरी प्रचंड प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
