AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या मुलीची झोप ठरली सर्वात चांगली, या बदल्यात तिला किती लाख मिळाले असतील, अंदाज तर लावा

लहानपणापासूनच त्रिपर्णाला झोपायला खूप आवडतं. तिचे झोपेचे अनेक किस्से आहेत. ती कधी बोर्डाची परीक्षा देताना परीक्षा केंद्रात झोपायची, तर कधी नोकरीसाठी मुलाखत देताना झोपून जायची.

या मुलीची झोप ठरली सर्वात चांगली, या बदल्यात तिला किती लाख मिळाले असतील, अंदाज तर लावा
Triparna Chakraborty Sleep Champion
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Sep 07, 2022 | 5:46 PM
Share

आपल्याला जे आवडतं त्यासाठी आपल्याला कुणी पैसे दिले तर? फक्त झोपण्याचे कुणी पैसे दिले तर? कल्पना करा! कोलकाताच्या 26 वर्षीय त्रिपर्णा चक्रवर्तीला (Triparna Chakraborty) तिच्या आवडत्या कामाचे 5 लाख रुपये मिळालेत. तिच्यासाठी हे एखाद्या स्वप्नासारखं होतं. झोपेची स्पर्धा असू शकते असं जर कुणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. त्रिपर्णा चक्रवर्ती ही भारताची पहिली स्लीप चॅम्पियन (India’s First Sleep Champion) बनलीये. सोशल मीडियावर (Social Media) झोपण्याच्या स्पर्धेबद्दल त्रिपर्णाला माहिती मिळाली.

लहानपणापासूनच त्रिपर्णाला झोपायला खूप आवडतं. तिचे झोपेचे अनेक किस्से आहेत. ती कधी बोर्डाची परीक्षा देताना परीक्षा केंद्रात झोपायची, तर कधी नोकरीसाठी मुलाखत देताना झोपून जायची.

नुकतीच एका महागड्या गादी उत्पादक कंपनीने एक स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेत त्रिपर्णाने सलग 100 दिवस रोज 9 तास झोपून सर्वोत्तम स्लीपरचा पुरस्कार पटकावला. देशभरातील सुमारे साडेपाच लाख स्पर्धकांनी या झोपेच्या स्पर्धेत भाग घेतला होता.

त्रिपर्णा एका अमेरिकन कंपनीत काम करते. सलग 100 दिवसात 9 तास झोपणारी त्रिपर्णा ही पहिली व्यक्ती आहे. अंतिम सामन्यादरम्यान झोपेवर लक्ष ठेवण्यासाठी संघटनेचे एक शिष्टमंडळ त्रिपर्णाच्या घरी पाठविण्यात आले होते.

उरलेल्यांना मागे टाकून त्रिपर्णाने झोपेच्या स्पर्धेचा मुकुट जिंकला. संस्थेच्या म्हणण्यानुसार, 100 दिवसांच्या या चॅलेंजमध्ये प्रत्येक स्पर्धकाला 9 तास झोपावे लागले. प्रत्येक स्पर्धकाच्या स्लीप स्कोअरमध्ये त्रिपर्णाने सर्वाधिक गुण मिळवले. तिचा स्लीप स्कोअर 100 पैकी 95 होता.

‘द फर्स्ट स्लीप चॅम्पियन ऑफ इंडिया’चा मुकुट मिळवलेल्या त्रिपर्णाने आयुष्यात कष्ट करणाऱ्या प्रत्येकासाठी झोप किती गरजेची आहे हे सांगण्यावर भर दिलाय.

ती म्हणते, “पैसा हा कामाचा एक रोमांचक भाग असला, तरी मनाची शांती आणि यश मिळवण्यासाठी 8 तासांची चांगली झोप हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.”

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग