Full Moon : अंतराळातून असा दिसतो चंद्र, इंटरनॅशनल स्पेस स्टेशननं शेअर केले काही फोटो

| Updated on: Dec 07, 2020 | 4:03 PM

अंतराळातील जग कमालीचं सुंदर आहे. अंतराळात रस असणारे लोक त्यासंबंधित प्रत्येक नवीन बातम्यांवरील बदलांवर लक्ष ठेवत असतात. (This is what the moon looks like from space, some photos shared by the International Space Station)

Full Moon : अंतराळातून असा दिसतो चंद्र, इंटरनॅशनल स्पेस स्टेशननं शेअर केले काही फोटो
Follow us on

मुंबई : अंतराळातील जग कमालीचं सुंदर आहे. अंतराळात रस असणारे लोक त्यासंबंधित प्रत्येक नवीन बातम्यांवरील बदलांवर लक्ष ठेवत असतात. इंटरनेटवरही चंद्र, तारे, पृथ्वी, आकाश अशी अनेक चित्रे आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.अंतराळाबाबतची लोकांची उत्सुकता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थाही तसे फोटो शेअर करत असते.अलीकडेच त्यांनी बाह्य अंतराळातील पूर्ण चंद्राचे काही फोटो शेअर केले आहेत हे फोटो लोकांची मनं जिंकत आहे.

“पूर्ण चंद्र महिन्यातून एकदा दिसतो आणि हे सुंदर दृश्य पृथ्वीवरील 250 मैलांवरुन पाहिले जाऊ शकतं.” असं कॅप्शन देत इंटरनॅशनल स्पेस स्टेशननं आपल्या ट्विटर अकाऊंटवर पौर्णिमेचे काही छायाचित्रं शेअर केले आहेत. सोशल मीडियावर लोकांना हे फोटो प्रचंड आवडत आहेत. आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी हे फोटो पाहिले आहेत आणि 60 हजाराहून अधिक लोकांनी हे फोटो रीट्वीट केले आहे.