लक्ष्मीने या ताईंच्या घरी तरी नक्कीच यायला पाहिजे! जीव धोक्यात घालून साफसफाई, दिवाळीची तयारी…

ताई बघा, दिवाळी आली म्हणून या घराची साफसफाई करतायत. एकही भाग त्यांना सोडायचा नाही मग तो कितीही जोखमीचा असो.

लक्ष्मीने या ताईंच्या घरी तरी नक्कीच यायला पाहिजे! जीव धोक्यात घालून साफसफाई, दिवाळीची तयारी...
cleaning
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 22, 2022 | 11:50 AM

दिवाळीची मजा मस्ती एकीकडे आणि दिवाळीची साफसफाई एकीकडे. दिवाळीच्या आधी घरात ठरवलं जातं की आपण कधी साफसफाई करायची, कुणी कुणी करायची, कशी करायची. एक असा दिवस ठरवून मग सगळे मिळून त्या दिवशी घराची साफसफाई करतात. जितकं या सणाला महत्त्व आहे तितकंच त्या आधी होणाऱ्या साफसफाईला. आता या ताई बघा. दिवाळी आली म्हणून या घराची साफसफाई करतायत. घरातला एकही भाग त्यांना सोडायचा नाही मग तो कितीही जोखमीचा असो.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक इमारत दिसतीये. या व्हिडिओमध्ये या ताई त्यांच्या घराची खिडकी साफ करताना दिसतायत.

ही खिडकी खूप उंचीवर आहे. अर्थातच फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे ती जोखमीचीच आहे. पण तरीही या ताई खिडकीच्या बाहेर येऊन खिडकी साफ करताना दिसतायत.

खिडकीला बाल्कनी नाही. पाय घसरल्यास अनेक मजले खाली पडण्याचा धोका. ही जागा अजिबातच सुरक्षित नाही. पण महत्त्वाचं काय आहे? दिवाळीची साफसफाई! कारण धोका माहीत असूनही ती स्त्री आरामात साफसफाई करतीये.

हा व्हिडिओ @sagarcasm नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. दिवाळीच्या आधी आलेल्या या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

हा व्हिडिओ 18 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून 56 हजारांहून अधिक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.