Video : वाघ खूप धावला, पण हरण काही सापडलं नाही, मग…

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत हा व्हिडीओ 17 हजार लोकांनी पाहिला आहे.

Video : वाघ खूप धावला, पण हरण काही सापडलं नाही, मग...
viral video
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 18, 2023 | 1:26 PM

उत्तराखंड : सोशल मीडियावर (Social media) प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल (animal viral video) होतात. काही व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडतात, तर काही व्हिडीओ भयानक हल्ल्याचे असतात. काहीही असले तरी लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला आवडतात आणि ते शेअर देखील करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ उत्तराखंड (uttarakhand) राज्यातील जिम कॉर्बेट नेशनल पार्कमधील असल्याचं स्पष्ट झाल आहे. व्हिडीओ पाहिल्यापासून नेटकरी कमेंट करीत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हरणाने वाघाला हरवल्याचं स्पष्ट दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर आईएफएस अधिकारी साकेत बडोला यांनी शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये मोठा वाघ दिसत आहे. तो वाघ हरणाचा पाठलाग करीत आहे. त्यावेळी तो हरणाच्या एकदम जवळ जातो. परंतु ज्यावेळी हल्ला करणार त्याचवेळी हरण आपल्या रस्त्यात बदल करतं वाघ जाग्यावर थांबतो.

शिकार करण्यात अयशस्वी झालेला वाघ

हा व्हिडीओ ज्यावेळी ट्विटरवरती शेअर करण्यात आला. त्यावेळी आईएफएस अधिकारी साकेत बडोला यांनी कॅप्शनमध्ये “ज्यांना असे वाटते की टॉपच्या प्राण्यासाठी शिकार करणं सोपे आहे.”असं लिहिलं आहे. त्या व्हिडीओला तुम्ही पुन्हा एकदा पाहा वाघ शिकार करण्यासाठी पुन्हा असफल होत आहे. त्याचबरोबर त्यांनी आयुष्यात कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही असं म्हटलं आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात…

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत हा व्हिडीओ 17 हजार लोकांनी पाहिला आहे. तसेच हा व्हिडीओ अधिक लोकांच्या पसंतीला पडला आहे. नेटकरी त्यावर कायम कमेंट करीत आहेत.