AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे, कोल्हापूर ते संभाजीनगर… राज्यातील 12 जिल्ह्यांत मतदानाचा उत्साह; किती जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज मतदान?

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. एकूण ७३१ जिल्हा परिषद गट आणि १,४६२ पंचायत समिती गणांसाठी ७,४३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पुणे, कोल्हापूर ते संभाजीनगर... राज्यातील 12 जिल्ह्यांत मतदानाचा उत्साह; किती जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज मतदान?
Maharashtra ZP and Panchayat Samiti Election
| Updated on: Feb 07, 2026 | 9:02 AM
Share

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजले असून आज १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. राज्यातील ग्रामीण भागाचा कणा समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत एकूण ७३१ जिल्हा परिषद गट आणि १ हजार ४६२ पंचायत समिती गणांसाठी मतदान होत आहे. या महासंग्रामात ७ हजार ४३८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. यासाठी सुमारे २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावत आहेत. यामुळे राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

किती जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी मतदान?

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, प्रत्येक जिल्ह्यात किती जिल्हा परिषद गट (जागा) आणि किती पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे, याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे.

अनुक्रम जिल्हा जिल्हा परिषद गट (जागा) पंचायत समित्यांची संख्या
१ पुणे ७३ जागा १३ पंचायत समित्या
२ सोलापूर ७२ जागा ११ पंचायत समित्या
३ कोल्हापूर ६७ जागा १२ पंचायत समित्या
४ सातारा ६४ जागा ११ पंचायत समित्या
५ छत्रपती संभाजीनगर ६३ जागा ९ पंचायत समित्या
६ सांगली ६१ जागा १० पंचायत समित्या
७ रायगड ५९ जागा १५ पंचायत समित्या
८ लातूर ५८ जागा १० पंचायत समित्या
९ रत्नागिरी ५६ जागा ९ पंचायत समित्या
१० धाराशिव ५५ जागा ८ पंचायत समित्या
११ परभणी ५३ जागा ९ पंचायत समित्या
१२ सिंधुदुर्ग ५० जागा ८ पंचायत समित्या
एकूण ७३१ जागा १२५ पंचायत समित्या

मतदारांना दोन मते द्यावी लागणार

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी २,६२४ उमेदवार रिंगणात आहे. तर पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी ४,८१४ उमेदवार नशीब आजमावत आहेत. या एकूण जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. जिल्हा परिषदेत ३६९ तर पंचायत समित्यांमध्ये ७३१ जागांवर महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रशासनाने २५,४७१ मतदान केंद्रे उभारली असून, १ लाख २८ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुरक्षेसाठी राज्यभर मोठा पोलीस फौजफाटा तैनात आहे. यावेळी मतदारांना दोन मते द्यायची आहेत. जिल्हा परिषद गटासाठी पांढऱ्या रंगाचे आणि पंचायत समिती गणासाठी गुलाबी रंगाचे बॅलेट युनिट मतदान केंद्रावर उपलब्ध आहे.

निकाल कधी?

आज सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत मतदान पार पडणार आहे. या सर्व जागांचा निकाल ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर होईल. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत कोणत्या जिल्हा परिषदेवर कोणाची वर्णी, कोणती पंचायत समिती कोणाच्या ताब्यात जाणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...