Photo : मिझोरमच्या डंपा रिझर्व्हमध्ये 7 वर्षानंतर वाघोबाचे दर्शन, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Jun 14, 2021 | 2:09 PM

सात वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर डंपा रिझर्व्हमध्ये वाघाची पहिली झलक दिसली आहे. याआधी 2014 मध्ये या क्षेत्रात वाघाचे दर्शन झाले होते.

Photo : मिझोरमच्या डंपा रिझर्व्हमध्ये 7 वर्षानंतर वाघोबाचे दर्शन, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
viral tiger photo
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर दररोज काहींना काहीतरी व्हायरल होत असते. एखादा फोटो, व्हिडीओ चर्चेचा विषय होत असतो. असाच एका वाघोबाचा फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो मिझोरमच्या डंपा रिझर्व्हमधील आहे. याठिकाणी सात वर्षानंतर वाघाचे दर्शन झाले आहे. 2014 ला शेवटचा वाघ दिसल्यानंतर 2018 मध्ये एका रिपोर्टमध्ये याठीकाणी मागील बऱ्याच काळापासून वाघ नसल्याचं म्हटलं होत. त्यानंतर आता पुन्हा वाघ दिसल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (Tiger Spotted At Mizorams Dampa Reserve after 7 Years Photos goes Viral)

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्यात मागील काही वर्षांत वाघांच्या संख्येत घट झाल्याने आपला राष्ट्रीय प्राणी नामशेष होण्याचा मार्गावर होता. त्यामुले Save Tiger या सारख्या अनेक योजना राबवून वाघांची संख्या वाढवून त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारसह अनेक संस्थानी उचलली. त्यामुळे एखाद्या नवीन वाघाचे दर्शन झाल्यावर सर्वचजण आनंदी होतात.

कसा काढला फोटो?

डंपा रिझर्व्हमध्ये बऱ्याच काळापासून वाघ दिसला नसल्याने वाघ नक्की आहे का? यासाठी ज़खुमा डॉन यांनी फेब्रुवारी, 2021 मध्ये डंपा रिझर्व्ह फ़ॉरेस्टमध्ये कॅमेरा ट्रॅप लावला होता. ज्यात तब्बल 3 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर 16 मे रोजी जेव्हा डॉन यांनी कॅमेरा चेक केला तेव्हा ते त्यांना एका फोटोत झाडात लपलेला वाघोबा दिसला. डॉनने तुरंत संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली. ज्यानंतर लगेचच WWI चे
वन्यजीव विशेषज्ञ डॉ. ललियनपुई कवलनी आणि त्याच्या टीमने तपासणी करुन संबधित फोटो वाघाचाच असल्याची पुष्टी केली.

नेटकरी आनंदी

सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. अनेकजण या फोटोला लाईक करत असून त्यावर कमेंट देखील करत आहेत. अनेक युजर्सनी या ठिकाणी पुन्हा वाघ दिसणं खरच खूप आनंददायी आहे. याठिकाणाहून वाघ निघून गेले आहेत. असे वाटत असताना हा फोटो एक आशेची किरण आहे. असं मत नेटकरी देत आहेत.

हे ही वाचा : 

Video | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video | चेहरा झाककेली महिला, एक हात मागे; समोरच्या हतबल तरुणाचं नेमकं काय होणार ?, पाहा संपूर्ण व्हिडीओ

Video | पाणी पिण्यासाठी जीव व्याकूळ, तहानलेल्या हत्तीचा संयम एकदा पहाच !

(Tiger Spotted At Mizorams Dampa Reserve after 7 Years Photos goes Viral)