AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: अमेरिका भारताला नाचवत्ये, नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या हातातील कठपुतळी – राऊतांचा हल्लाबोल

इराण-इस्त्रायल युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतासह जगाला तेल तुटवड्याचा धोका निर्माण झाला. अशा स्थितीत अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदीसाठी ३० दिवसांची सूट दिली. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर 'अमेरिकेची कठपुतळी' म्हणून जोरदार टीका केली, भारताला स्वतःच्या हितासाठी अमेरिकेची परवानगी का लागते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Sanjay Raut: अमेरिका भारताला नाचवत्ये, नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या हातातील कठपुतळी - राऊतांचा हल्लाबोल
संजय राूतांचा सरकारवर हल्लाबोल
| Updated on: Mar 06, 2026 | 11:02 AM
Share

अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर चढवलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हाजरला. याचे पडसाद जगभरातही उमटायला लागले आहेत. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचाही मृत्यू झाला. तसेच दोन्ही देशांचे इराणवरील हल्लेही वाढले. यामुळे संतापलेल्या इराणने अमेरिका आणि इस्रायवर जोरदार प्रतिहल्ले सुरू केल्याने युद्ध आणखीनतच भडकलं असून संपूर्ण जगालाही त्याची झळ बसत आहे. तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनी इराणने बंद केल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. याचा फटका भरतासह जगातील अनेक देशांना बसला. इराणचा समुद्री मार्ग स्टेट ऑफ होर्मुजच्या माध्यमातून भारतात मोठ्या संख्येने तेल येतं, मात्र तोच मार्ग इराणने बंद केल्याने भारतात, तेल तसेच एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली.

मात्र या दरम्यान आता अमेरिकेने भारतासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. समुद्रात अडकलेल्या रशियन तेल टँकर खरेदी करण्यासाठी भारताला अमेरिकेकडून ३० दिवसांची सूट देण्यात आली , अशी माहिती समोर आली आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करावे, अशी परवानगी अमेरिकेकडून देण्यात आली आहे. मात्र ही सूट अवघ्य 30 दिवसांसाठी आहे. “भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचा प्रवाह सुरू ठेवण्यासाठी अमेरिका भारताला रशियन तेल खरेदी करण्यास 30दिवसांची सूट देत आहे” असं अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी म्हटलं होतं.

मात्र आता याच मुद्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी बारत सरकारवर तसेच पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आहे. अमेरिका भारताला नाचवत्ये, नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या हातातील कठपुतळी आहेत, अशा शब्दांत राऊतांनी टीकास्त्त्र सोडलं.

काय म्हणाले राऊत ?

रशियाकडून तेल घ्यायला आम्ही तुम्हाला परवानगी दिली आहे, असं अमेरिका भारताला सांगत आहे. हे आम्ही (भारत ) ठरवत नाहीये. भारताला अमेरिका नाचवत्ये. नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कठपतुळी आहेत. अमेरिकेच्या फॉरेन सेक्रेटरींनी जे ट्विट केलं आहे, भारताला आम्ही परवानगी दिली आहे, असं त्यांनी म्हटलंय. परवानगी ही गुलामांना देतात. हो आम्ही तु्म्हाला आज परवानगी दिलेली आहे, तुम्ही हे खरेदी करू शकता, तुम्ही इथे फिरू शकता, तुम्ही यांच्याशी बोलू शकता. अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिली जाते. अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो. सध्याच्या युद्धपरिस्थितीमध्ये आम्हाला गरज आहे, म्हणून रशियाकडून तेल खरेदी करण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही. अमेरिकेच्या मेहेरबानीवरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असू, तर थूत तुमच्या जिंदगानीवर.. अशा खोचक शब्दांत संजय राऊतांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

पंतप्रधानांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणीही राऊत यांनी केली.

युद्धखोर लांडग्याविरुद्ध उभं राहण्याची हिंमतच नाही 

या युद्ध परिस्थितीत ज्याप्रमाणे भारताचं नेतृत्व चूप आहे, याचा अर्थ या युद्धखोर लांडग्याविरुद्ध उभं राहण्याची त्यांच्यामध्ये हिंमतच नाहीये, अशी टीकाही राऊतांनी केली. या युद्धखोर परिस्थितीमुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, निर्यातीवर फार बंधनं आली आहेत. शेती उत्पादन, फळ फळावळ, कापड, टेक्स्टाईल यावर बंधनं आली आहेत. यावर सरकारकडे याक्षणी कोणतीही भूमिका नाही. काही विद्यार्थी, पर्यचक, काम धंद्यासाठी गेलेले नागरिक, अशी  आमची हजारो लोकं ठिकठिकाणी अडकून पडले आहेत, यावर काय करणार याबद्दलही सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाहीये.  परिस्थिती फार गंभीर आहे, असं म्हणत राऊतांनी सरकारवर निशाणा साधला.

Follow Us
युद्धखोरांविरोधात उभं राहायची सत्ताधाऱ्यांची हिंमत नाही; राऊतांची टीका
युद्धखोरांविरोधात उभं राहायची सत्ताधाऱ्यांची हिंमत नाही; राऊतांची टीका.
राष्ट्रीय फुटबॉल ट्रायल्सचा पहिला दिवस खानिकर स्टेडियममध्ये पार पडला
राष्ट्रीय फुटबॉल ट्रायल्सचा पहिला दिवस खानिकर स्टेडियममध्ये पार पडला.
फडणवीस मांडणार राज्याचा अर्थसंकल्प; आर्थिक पाहणी अहवाल काय?
फडणवीस मांडणार राज्याचा अर्थसंकल्प; आर्थिक पाहणी अहवाल काय?.
ते त्यांच्या पक्षाचे संस्कार! संजय राऊतांची ज्योती वाघमारेंवर टीका
ते त्यांच्या पक्षाचे संस्कार! संजय राऊतांची ज्योती वाघमारेंवर टीका.
दुबईत अडकलेले खासदार कल्याण काळे अखेर संभाजीनगरमध्ये परतले
दुबईत अडकलेले खासदार कल्याण काळे अखेर संभाजीनगरमध्ये परतले.
व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची 8 तास CID चौकशी!
व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची 8 तास CID चौकशी!.
अजित पवारांची खूप आठवण येतेय; पार्थ पवारांचं भावनिक ट्विट
अजित पवारांची खूप आठवण येतेय; पार्थ पवारांचं भावनिक ट्विट.
राष्ट्रवादीच्या 20-25 आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
राष्ट्रवादीच्या 20-25 आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध, 7 उमेदवार थेट खासदार! अडसूळ मात्र नाराज
राज्यसभा निवडणूक बिनविरोध, 7 उमेदवार थेट खासदार! अडसूळ मात्र नाराज.
बिहारमध्ये राजकीय भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्री भाजपचा?
बिहारमध्ये राजकीय भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्री भाजपचा?.