बाबा वेंगानेही वर्तवली नव्हती एवढी भयानक भविष्यवाणी, टाइम ट्रॅव्हलरच्या भाकिताने जगात उडालीय खळबळ
स्वंघोषित टाइम ट्रॅव्हलर एल्विस थॉम्पसनने 2025 साठी भयानक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्याच्या मते, एप्रीलमध्ये ओक्लाहोमावर प्रचंड वादळ येईल, मे महिन्यात अमेरिकेत गृहयुद्ध सुरू होईल आणि सप्टेंबरमध्ये एलियन पृथ्वीवर येतील. या भविष्यवाण्यांमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांच्या भविष्यवाणी आपण नेहमीच ऐकत असतो. त्यांच्या भयानक भविष्यवाण्या खऱ्याही ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांची एखादी भविष्यवाणी समोर आली की जगाची भीतीनं गाळण उडते. कारण त्यांची भाकितं बहुतेक करून निसर्गाशी संबंधित असतात आणि ही नैसर्गिक आपत्ती थोपवणं कठिण असतं, त्यामुळे जगाला या भाकितांनी घाम फोडलेला असतो. आता एका एल्विस थॉम्पसन नावाच्या व्यक्तीने बाबा वेंगा यांच्यापेक्षाही भयंकर भविष्यवाणी केली आहे. एल्विस स्वत:ला टाइम ट्रॅव्हलर समजतो. त्याने येत्या एक दोन महिन्याबाबतच्याच भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यामुळे एल्विस सांगतो ते खरं ठरणार का हे येत्या एकदोन महिन्यातच कळणार आहे.
एल्विस थॉम्पसनने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही भविष्यवाणी केली आहे. 2025 मध्ये होणाऱ्या विनाशकारी घटनांबाबतची पोस्टच त्याने टाकली आहे. त्यामुळे या पोस्टकडे जगातील लोकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. त्याने एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात त्याने हे दावे केले आहेत. 6 एप्रिल रोजी अमेरिकेच्या ओक्लाहोमा एका 24 किलोमीटर मोठ्या वादळाने संपुष्टात येईल. या वादळाच्या हवेचा वेग ताशी 1,046 किलीमीटर एवढा असेल. या वादळामुळे ओक्लाहोमा शहरच नष्ट होईल, असा दावा एल्विसने केला आहे. तसेच येत्या 27 मेपर्यंत अमेरिकेला गृहयुद्धाला सामोरे जावे लागणार आहे. अमेरिकेच्या गृहयुद्धामुळे टेक्सास शहर अमेरिकेपासून वेगळं होईल. त्यासोबतच परमाणू संघर्ष सुरू होईल, त्यामुळे देश बर्बाद होईल, असं भाकीतही त्याने वर्तवलं आहे.
भविष्यवाणी काय सांगतात?
एल्विसच्या या भविष्यवाण्यांमुळे वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच लोकांमध्ये संशयाचं वातावरणही निर्माण झालं आहे. काही लोकांनी तर एल्विसच्या म्हणण्याची खिल्ली उडवली आहे. तर काही लोकांनी त्याने सांगितलेल्या भाकितांवर चिंता व्यक्त केली आहे. एल्विसने मानवाची पहिल्यांदाच एलियनशी भेट होणार असल्याचंही म्हटलं आहे. 1 सप्टेंबर रोजी चॅम्पियन नावाचा एक एलियन पृथ्वीवर येईल. तसेच 12,000 लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी तो दूरच्या ग्रहावर घेऊन जाणार आहे, असा दावाही त्याने केला आहे.
सोशल मीडियातून प्रतिक्रिया
एल्विसचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर 2.6 कोटी वेळा पाहिला गेला आहे. काही वाचकांनी त्याची खिल्ली उडवलीय. तर काहींनी त्याला सल्ला दिला आहे. स्वयंघोषित टाइम ट्रॅव्हलरने पुढच्या आठवड्याच्या लॉटरीचे नंबरही आणायला हवे होते, असं एकाने म्हटलंय. तर मी आता हा व्हिडीओ माझ्याकडे ठेवणार आहे. यातील भविष्यवाणी खोटी ठरली तर मी एल्विसला कोर्टात खेचणार आहे, असं दुसऱ्याने म्हटलंय.
