हा बघा ‘हा’! याचा सगळा स्टंट पोलिसांनी बाहेर काढला, जशास तसं उत्तर!

इंटरनेटवर वाहनचालकांच्या स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होता असतात. पण आता या व्हायरल व्हिडीओज वर पोलीस सुद्धा लक्ष ठेऊन आहेत बरं का...

हा बघा हा! याचा सगळा स्टंट पोलिसांनी बाहेर काढला, जशास तसं उत्तर!
Stunt Video
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 27, 2022 | 1:18 PM

एक व्यक्ती रस्त्यावर खूपच दिमाखात बाईक चालवत होता. स्टंट मारत गाडीवर असा ऐटीत बसला होता की जसं काय रस्ता आपला आहे, शहर आपलं आहे, ट्राफिक पोलीस आपले आहेत. कसलीच भीती नाही. कसलंच बंधन नाही, कसलेच नियम नाहीत अशा आविर्भावात हा रस्त्यावरून स्टंट मारत फिरत होता. बरं त्याने या स्टंटचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ जाम व्हायरल झाला. गोष्ट इतक्यावरच थांबली नाही. खरी गोष्ट तर पुढे आहे. पोलिसांनी हा व्हिडीओ चांगलाच बघितला आणि भाऊंना जबरदस्त शिक्षा दिली. उठाबशा काढायला लावल्या, मोक्कार दंड भरायला लावला. या सगळ्याचा एक मजेशीर व्हिडीओ बनवून पोलिसांनीच तो पोस्ट केला. आता हा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडतोय.

इंटरनेटवर वाहनचालकांच्या स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होता असतात. पण आता या व्हायरल व्हिडीओज वर पोलीस सुद्धा लक्ष ठेऊन आहेत बरं का…

रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत. दुर्ग पोलिसांनी ट्विटर हँडलवर असाच एक स्टंटमॅनचा व्हिडिओ शेअर केला आहे जो रस्त्यावर आपल्या बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसतोय.

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी त्या व्यक्तीला जबर दंड तर ठोठावलाच शिवाय त्याला उठाबशा काढायला लावल्या. व्हिडीओ शेअर करत पोलिसांनी लोकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडिओ

या क्लिपला 2 लाखपेक्षा जास्त व्ह्यूज आणि 9 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युझर्सनी पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे.

व्हायरल व्हिडिओनंतर ‘दुर्ग ट्रॅफिक पोलिसां’ने मोटारसायकल स्वाराला ४२०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिपोर्टनुसार, स्टंट बाईकरने बाईकवर बसून स्टंट केले आणि नंतर आपला सोशल मीडिया शेअर केला जो व्हायरल झाला.

हा व्हिडिओ दुर्ग पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्या व्यक्तीला पकडून कारवाई केली. आता दुर्ग पोलिसही सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत, असे सांगण्यात आले.