Love Story : बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर त्याचं सर्व कर्ज फेडलं, त्याच्या आई-वडिलांना संभाळते, कोण आहे ती?
Love Story : बहुतांश नात्यांमध्ये व्यवहार, मतलब असतो. प्रेमामध्ये स्वार्थ मोठा होत चालला आहे. प्रेम अमर असतं, फक्त ते निभावणारा पाहिजे. अशीच एका खऱ्याप्रेमाची कथा समोर आली आहे.

प्रेम ही भावना जितकी सुंदर आहे, तितकीच त्यात खडतर परीक्षा सुद्धा आहे. सध्या खरं प्रेम ही संकल्पनाच दुर्मिळ होत चालली आहे. आता बहुतांश नात्यांमध्ये व्यवहार, मतलब असतो. प्रेमामध्ये स्वार्थ मोठा होत चालला आहे. प्रेम अमर असतं, फक्त ते निभावणारा पाहिजे. अशीच एका खऱ्याप्रेमाची कथा समोर आली आहे. या कथेतील प्रियकर आणि प्रेयसी दोघे चीनचे आहेत. या कथेत प्रेयसीने प्रियकराच्या मृत्यूनंतर त्याचं सर्व कर्ज फेडलं. एवढच नाही, आता ती प्रियकराच्या पश्चात त्याच्या आई-वडिलांचा सुद्धा संभाळ करते. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने ही बातमी दिलीय. वांग टिंग आणि जेंग जी परस्परांच्या प्रेमात होते. वांग टिंग आता 34 वर्षांची आहे. 2016 साली एका कार दुर्घटनेत जेंग जी चा मृत्यू झाला.
जेंग जी बिझनेसमन होता. जेंग जी अकाली हे जग सोडून निघून गेला. पण त्याच्यामागे कर्जाचा डोंगर होता. स्टाफचा पगार बाकी होता. काही बिलं फेडायची होती. काही मित्रांकडून घेतलेलं कर्ज होतं. जेंगच्या मृत्यूनंतर वांग टिंगने त्याचं सर्व कर्ज फेडायचं ठरवलं. जेंग जी च कर्ज फेडलं नाही, तर त्याला कर्ज देणाऱ्यांच घर कसं चालेलं? असा विचार तिने केला. जेंग जी च्या आई-वडिलांची वर्षाची कमाई फक्त 7 हजार डॉलर होती. वांग टिंगने तिच्याकडे जमवलेले 27 हजार डॉलर देऊन कर्ज फेडलं. त्याशिवाय एका मित्राकडून आणखी 9 हजार डॉलर उधारीवर घेऊन कर्ज फेडलं.
तिच पहिलं प्रेम विसरलेली नाही
उधारी चुकवली आणि मागची सगळी नाती विसरली, असं वांग टिंगने केलं नाही. ती अजूनही तिच्या प्रियकराच्या आई-वडिलांच्या संपर्कात आहे. 2020 मध्ये वांग टिंगने लग्न केलं, त्यावेळी त्याच्या आई-वडिलांना सुद्धा बोलावलं. ती म्हणते, माझे सहा आई-वडिल आहेत. वांग टिंग दोन बिझनेसची मालकीण आहे. एक जेवणाचा आणि दुसरा पर्यटनाचा. वांग टिंग अजूनही तिच पहिलं प्रेम विसरलेली नाही.
अजूनही प्रियकराच्या आई-वडिलांसाठी काय-काय करते?
वांग एक पाऊल पुढे आहे. ती पूर्व प्रियकर जेंग जी च्या आई-वडिलांसाठी आधारस्तंभ आहे. मुलाच्या मृत्यूनंतर कोसळून गेलेल्या जेंगच्या आईला आधार दिला. वांग त्यांना दरवर्षी एका ट्रिपवर फिरायला घेऊन जाते. जेंगचे वडिल रुग्णालयात असताना ती त्यांच्यासोबत होती. जेंगच्या आईला आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी पेन्शन कव्हर जमा करते.