Video : बसवर टस्कर हत्तीचा हल्ला, पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले, थरकाप उडवणारा व्हायरल व्हिडीओ

कधीकधी माणसांनाही हत्तीच्या रागाचा सामना करावा लागतो. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हत्तीचा राग काय असतो हे कळेल.

Video : बसवर टस्कर हत्तीचा हल्ला, पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले, थरकाप उडवणारा व्हायरल व्हिडीओ
हा प्रसंग निलगिरी फॉरेस्टमधील असल्याचे सांगितले जात आहे
| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 11:52 AM

हत्तींची गणना जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जाते. त्यांच्या शहाणपणाचे किस्से रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण हा समजूतदार प्राणीही कधी कधी खूप रागावतो. अगदी सिंह आणि जंगलाचा राजा वाघसुद्धा त्याच्या रागासमोर नतमस्तक होतात. कधीकधी माणसांनाही हत्तीच्या रागाचा सामना करावा लागतो. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हत्तीचा राग काय असतो हे कळेल. ( Tusker elephant attacks bus. The bus driver’s incident saved the lives of the passengers, video viral)

हा प्रसंग निलगिरी फॉरेस्टमधील असल्याचे सांगितले जात आहे, जिथं एका बस चालकाने अत्यंत समजूतदारपणे संतापलेल्या हत्तीला हाताळलं. म्हणजेच, त्याने अत्यंत हुशारीने परिस्थिती हाताळली आणि प्रवाशांना सुरक्षित त्या ठिकाणाहून बाहेर काढलं.

पाहा व्हिडीओ:

या ड्रायव्हरची कथा शेअर करताना भारतीय वन सेवा अधिकारी (IFS) सुप्रिया साहू यांनी लिहिलं, ‘मी निलगिरीच्या या सरकारी बस चालकाचा आदर करते, बसवर हत्तीने हल्ला केला आणि बसची काच फोडली, तरीही चालकाने धीर धरला. या चालकाने मोठ्या समंजसपणाने परिस्थिती हाताळली. ‘कदाचित म्हणूनच असे म्हटले जाते की, शांत मन चमत्कार करत असतं.

बातमी लिहली जाईपर्यंत, या व्हिडीओला 8 हजाराहून अधिक लोकांनी पाहिलं होतं. तर 1 हजाराहून अधिक लाईक्सम मिळाले होते. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया लिहल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहलं, ‘प्रत्येक प्रसंगात शांत मनाने घेतलेला निर्णयच योग्य ठरतो.’ तर दुसऱ्याने म्हटलं, ‘चालकाने अत्यंत शांत मनाने निर्णय घेतला, तेच योग्य होतं’

हेही वाचा:

हर्षल पटेलच्या हॅट्रीकने मुंबई इंडियन्सचा खेळ बिघडला, RCB जिंकल्यानंतर फॅन्सकडून मुंबईची खिल्ली, इंटरनेटवर मजेशीर Memes व्हायरल

Viral Video : वृद्ध दाम्पत्यामधील क्युट प्रसंग इंटरनेटवर व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘याला म्हणतात खरं प्रेम’