ट्विटरवर कॉमेंट, लाईक करण्यासाठी लागणार पैसे, X चे मालक एलन मस्कचा निर्णय

| Updated on: Apr 17, 2024 | 2:55 PM

Elon Musk: एलन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X मध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. X वर असणारे बनावट खाती त्यांनी बंद केली आहेत. 26 फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान २ लाख १३ हजार अकाउंटस बंद केले गेले आहे. ही खाती कंपनीच्या पॉलिसीचे उल्लंघन करीत होते. यामुळे या अकाउंट्सवर कारवाई करण्यात आली.

ट्विटरवर कॉमेंट, लाईक करण्यासाठी लागणार पैसे, X चे मालक एलन मस्कचा निर्णय
Follow us on

एलन मस्क (Elon Musk) यांनी जेव्हापासून मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (आधीचे ट्विटर) ची कमान घेतली, तेव्हापासून झपाट्याने बदल करत आहेत. त्यांनी सुरुवातील मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली. त्यानंतर युजर्सला झटका दिला. मोफत असणारे ब्लू टीकसाठी पैसे घेणे सुरु केले. तसेच ट्विटरचा नाव आणि लोगही त्यांनी बदलला. आता पुन्हा एलन मस्क यांनी युजर्सकडून पैसे घेण्याची तयारी सुरु केली आहे. ट्विटरवर कॉमेंट, लाईक करण्यासाठी पैसे लागणार आहेत. पण नवीन युजर्सलाच हे पैसे द्यावे लागणार आहे. जुन्या युजर्सला आधीप्रमाणे ट्विटर वापरता येणार आहे.

का घेतला निर्णय

एलन मस्क याचा निर्णयाचा परिणाम X वर येणाऱ्या नवीन युजर्सवर होणार आहे. त्यांना एखाद्या पोस्टसाठी लाइक करणे, रिप्लाय देणे किंवा बुकमार्क करण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. एलन मस्क यांनी बॉट्समुळे येणाऱ्या अडचणीवर हा उपाय शोधला आहे. एलन मस्क यांनी X अकाउंट युजर्सच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. बॉट्सपासून वाचण्यासाठी युजर्सकडून शुल्क वसूल करणे, हा एकच पर्याय असल्याचे एलन मस्क यांना वाटत आहे.

हे सुद्धा वाचा

कोणाला द्यावे लागणार पैसे

मस्क यांनी म्हटले की, लाइक करणे, रिप्लाय देणे किंवा बुकमार्क करण्यासाठी पैसे देण्याचा नियम नव्याने X ज्वाइन करणाऱ्या युजर्ससाठी असणार आहे. नवीन खाते तीन महिन्यांचे झाल्यावर युजर्सला कोणतेही शुल्क न देता लाइक करणे, रिप्लाय देणे किंवा बुकमार्क करता येणार आहे.

एलन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X मध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. X वर असणारे बनावट खाती त्यांनी बंद केली आहेत. 26 फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान २ लाख १३ हजार अकाउंटस बंद केले गेले आहे. ही खाती कंपनीच्या पॉलिसीचे उल्लंघन करीत होते. यामुळे या अकाउंट्सवर कारवाई करण्यात आली.