ट्रेनचा डबा बनला आखाडा, दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; Video व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ट्रेनमध्ये एका सीटवरून दोन प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले आहे.

ट्रेनचा डबा बनला आखाडा, दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; Video व्हायरल
Fighting in Train
| Updated on: Jun 13, 2025 | 4:09 PM

सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ट्रेनमध्ये एका सीटवरून दोन प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ट्रेनच्या डब्यात दोन प्रवासी सीटवरून भांडत आहेत.याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वरच्या बर्थवर बसलेला एक व्यक्ती खाली उभ्या असलेल्या व्यक्तीशी सीट न दिल्याबद्दल वाद घालताना दिसत आहे. त्यानंतर दुसरा व्यक्ती त्याचा पाय धरून त्याला खाली खेचतो. वर बसलेला व्यक्ती खाली उतरताच दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होते. यात एक व्यक्ती दुसऱ्याला जोरदार मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे, तर आजूबाजूचे प्रवासी ही घटना पाहत आहेत.

लज्जास्पद घटना

सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला हा व्हिडिओ बिहारमधील असल्याचे बोलले जात आहे. मात्र ही घटना लज्जास्पद असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. सीटसारख्या छोट्या गोष्टीसाठी असा हिंसाचार चुकीचा आहे असं अनेकांनी म्हटलं आहे. एका युजरने लिहिले की, “एवढ्या छोट्या गोष्टीवरून लोक हिंसक होतात हे पाहून वाईट वाटते. ट्रेनमध्ये प्रवास करताना आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे.” तसेच काही लोकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटले की, “असे दिसते की आता आपल्याला सीटसाठी कुस्ती आयोजित करावी लागेल.”

कठोर कारवाईची मागणी

अनेक नेटकऱ्यांनी अशा घटनांवर रेल्वे प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. एकाने लिहिले की, “अशा घटना रोखण्यासाठी रेल्वेने कठोर नियम बनवावेत आणि गाड्यांमध्ये सुरक्षा वाढवावी.” काही लोकांनी असा प्रश्नही उपस्थित केला की, ‘हा व्हिडिओ खरा आहे की तो रीलसाठी बनवला गेला आहे हे तपासण्याची गरज आहे. गाड्यांमध्ये जागांची कमतरता आणि गर्दी हे अशा तणावाचे एक प्रमुख कारण आहे. दुसरे म्हणजे ही घटना आपल्याला सहिष्णुता आणि संयमाची गरज लक्षात आणून देते. जर दोन्ही बाजूंनी शांततेने चर्चा केली असती तर कदाचित हा वाद इतका वाढला नसता. दरम्यान, हा व्हिडिओ @epic.insta.daily नावाच्या अकाउंटवरून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.