अचानक बॉसने बोलावली तातडीची मिटिंग, कर्मचारी ऑफिसमध्ये येताच घडलं असं काही, Video पाहून सर्वच थक्क

बॉसने अचानक बोलावली कर्मचाऱ्यांची मिटिंग. सर्व कर्मचारी मिटिंगला येताच घडलं असं काही की काहीच्या चेहऱ्यावर होता आनंद तर काही कर्मचारी झालेले निराश. पण शेवटी जे घडलं ते पाहून सर्वांनीच केलं कौतुक.

अचानक बॉसने बोलावली तातडीची मिटिंग, कर्मचारी ऑफिसमध्ये येताच घडलं असं काही, Video पाहून सर्वच थक्क
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 10, 2026 | 3:58 PM

ऑफिस म्हटलं की कामाचा ताण, टार्गेट, डेडलाइन आणि बॉसच्या मीटिंग्स हे सगळं आलंच. मात्र, एखाद्या दिवशी बॉसने अचानक असं सरप्राइज दिलं की कर्मचाऱ्यांचा संपूर्ण दिवसच आनंदात जातो. असाच एक भन्नाट प्रकार संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) एका कंपनीत घडला आहे. या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या अनोख्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ ‘वर्ल्ड स्टार मॅनपॉवर’ या कंपनीशी संबंधित आहे. कंपनीचे संस्थापक निषाद हुसेन आणि त्यांची पत्नी हसीना निषाद यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कर्मचाऱ्यांना अचानक एका मीटिंग रूममध्ये बोलावण्यात येतं. तिथे टेबलवर अनेक गिफ्ट पॅकेट्स ठेवलेली असतात. कर्मचाऱ्यांनी एकेक करून आपापली पॅकेट्स उघडायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया पाहण्यासारख्या होत्या.

Loading...

काही कर्मचाऱ्यांच्या पॅकेटमध्ये महागडा आयफोन निघाला तर काहींच्या हातात फक्त चॉकलेट आलं. आयफोन मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मात्र, चॉकलेट मिळालेल्या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला थोडी निराशा झाल्याचं दिसत होतं. पण कंपनीच्या व्यवस्थापनाने खरी सरप्राइज पार्टी अजून बाकी ठेवली होती.

कर्मचाऱ्यांना थेट आयफोन भेट

काही वेळानंतर हसीना निषाद यांनी चॉकलेट मिळालेल्या कर्मचाऱ्यांनाही आयफोन भेट म्हणून दिले. त्यामुळे आधी थोडे निराश झालेले कर्मचारीही आनंदाने हसताना दिसले. या अनोख्या सरप्राइजमुळे मीटिंग रूममधील वातावरणच बदलून गेलं. भेटवस्तू देण्याची ही पद्धत पाहून अनेकांनी कंपनीचं कौतुक केलं आहे.

या व्हिडीओसोबत हसीना निषाद यांनी कर्मचाऱ्यांसाठी एक खास संदेशही शेअर केला. कर्मचाऱ्यांची मेहनत, सकारात्मक दृष्टिकोन आणि एकत्रितपणे काम करण्याची सवय ही कंपनीच्या यशामागची खरी ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं. प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, नव्या संधींचा स्वीकार करावा आणि एकमेकांना साथ द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

नेटकऱ्यांनी दिल्या खास प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी कंपनीच्या या कृतीचं कौतुक केलं तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया देत आपल्या बॉसला आणि कंपनीला टॅग करण्याची इच्छा व्यक्त केली. काहींनी तर असा बॉस आपल्यालाही मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

एकूणच, कर्मचाऱ्यांना दिलेल्या या अनोख्या भेटीमुळे कंपनीची चर्चा रंगली आहे. कामाच्या धावपळीत कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची दखल घेणं आणि त्यांना आनंदाचे क्षण देणं किती महत्त्वाचं आहे, हे या व्हिडीओतून अधोरेखित होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us