जगातील एकमेव ‘नर’ जो देतो बाळांना जन्म, वडिलांच्याच पोटात वाढतात लेकरं!
Seahorse : प्रत्येक प्राण्याची मादी पिलांना जन्म देते, मात्र पण सीहॉर्स (समुद्री घोडा) हा प्राणी याला अपवाद आहे. जगात हा एकमेव असा जीव आहे ज्यामध्ये नर आपल्या पोटात बाळ वाढवतो.

जगात हजारो प्रकारचे प्राणी आहेत, प्रत्येक प्राण्याची मादी पिलांना जन्म देते, मात्र पण सीहॉर्स (समुद्री घोडा) हा प्राणी याला अपवाद आहे. जगात हा एकमेव असा जीव आहे ज्यामध्ये नर आपल्या पोटात बाळ वाढवतो आणि शेवटी त्याला जन्म देतो. म्हणजेच न समुद्र घोडा प्रेग्नंट होतो. त्यामुळे समुद्री घोड्याची ही अनोखी प्रजनन प्रक्रिया जीवशास्त्रातील सर्वात रंजक विषयांपैकी एक मानली जाते. बहुतेक प्रजातींमध्ये मादी गर्भधारणा करते, पण सीहॉर्समध्ये ही भूमिका उलट असते. मादी सीहॉर्स अंडी तयार करते, मात्र ती नराच्या शरीरात हस्तांतरित करते. त्यानंतर नरच प्रसूतीची वेदना सहन करून पिल्लांना जन्म देतो.
कशी असते ही अनोखी गर्भावस्था?
समुद्र घोड्याची प्रजनन प्रक्रिया अत्यंत रोचक आहे. सर्वप्रथम नर आणि मादी एक खास प्रणय नृत्य करतात. ते आपापल्या शेपट्या एकमेकांमध्ये गुंफतात, एकत्र पोहतात आणि तासन्तास नृत्य करतात. या नृत्यानंतर मादी आपली अंडी नराच्या पोटावर असलेल्या विशेष पिशवीत ठेवते. अंडी त्या पिशवीत गेल्यानंतर नर त्यांचे संगोपन सुरू करतो. पिशवीच्या आत रक्तवाहिन्या तयार होतात ज्या अंड्यांना ऑक्सिजन आणि पोषण पुरवतात. ही प्रक्रिया सस्तन प्राण्यांमधील प्लेसेंटा प्रमाणे कार्य करते. ही गर्भावस्था 10 दिवसांपासून 6 आठवड्यांपर्यंत असू शकते.
प्रसूतीच्या वेदनाही सहन करतो नर
गर्भधारणेनंतर जेव्हा पिल्ले पूर्ण विकसित होतात, तेव्हा नर सीहॉर्सला प्रसूती वेदना सुरू होतात. तो आपले शरीर वारंवार वाकवतो आणि जोरदार हालचाल करून शेकडो ते हजारो पिल्लांना पाण्यात सोडतो. एका वेळी 100 ते 2000 पर्यंत छोटे सीहॉर्स जन्म घेतात. जन्मानंतर ही पिल्ले अगदी लहान सीहॉर्ससारखी दिसतात आणि लगेच स्वतंत्र जीवन सुरू करतात. त्यानंतर आई-वडील त्यांची कोणतीही काळजी घेत नाहीत.
शास्त्रज्ञांच्या मते, ही व्यवस्था प्रजातीच्या अस्तित्वासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मादी अंडी दिल्यानंतर लगेच नवीन अंडी तयार करण्यास सुरुवात करू शकते, तर नर आधीच्या अंड्यांची काळजी घेतो. त्यामुळे प्रजननाचा वेग खूप वाढतो. सीहॉर्सची ही पिशवी फक्त संरक्षणच देत नाही, तर तिच्या आतमधील पाणीही नियंत्रित करते. ज्यामुळे पिल्ले समुद्रातील वातावरणासाठी तयार होतात. काही संशोधनांमध्ये असेही आढळले आहे की, गर्भावस्थेदरम्यान नर सुमुद्री घोड्याच्या शरीरात हार्मोनल बदल होतात, जे मादी हार्मोन्सप्रमाणे कार्य करतात.