AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘डॉक्टरसमोर मला कपडे काढावे लागले’, लिंगबदल केलेल्या अनाया बांगरने सांगितला तो किस्सा; Video व्हायरल

Anaya Bangar : मुलापासून मुलगी बनलेली अनाया बांगर तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमितपणे शेअर करत असते. आता तिने एक धक्कादायक माहिती दिली आहे.

'डॉक्टरसमोर मला कपडे काढावे लागले', लिंगबदल केलेल्या अनाया बांगरने सांगितला तो किस्सा; Video व्हायरल
Anaya Bangar Latest NewsImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 05, 2026 | 7:41 PM
Share

माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगरची मुलगी अनाया बांगर गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे. मुलापासून मुलगी बनलेली अनाया बांगर तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमितपणे शेअर करत असते. अलिकडेच तिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये तिने जेंडर ट्रान्सफॉर्मेशनदरम्यान आलेल्या आव्हानांबद्दल भाष्य केले आहे. या व्हिडिओमध्ये तिने एक असा अनुभवही सांगितला, ज्यामध्ये तिला लिंग ओळखीचा पुरावा द्यावा लागला होता. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अनायाने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, अलीकडे ट्रान्सजेंडर कायद्यांतर्गत अधिकृत कागदपत्रांमध्ये बदल करण्यासाठी तिला स्वतःच्या स्त्रीत्वाचा पुरावा द्यावा लागला. त्यासाठी डॉक्टरांच्या वैद्यकीय समितीसमोर तिला कपडे काढून तपासणी करून घ्यावी लागली. हा संपूर्ण अनुभव अनायाने तिच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे मांडला आहे. अनायाने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

ट्रान्सजेंडर कायद्यानुसार वैद्यकीय तपासणी

अनाया म्हणाली की, ‘अलीकडे ट्रान्सजेंडर कायद्याअंतर्गत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मला सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय मंडळासमोर जावे लागले. तिथे डॉक्टरांनी माझी संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यासाठी मला कपडे काढण्यास सांगितले. त्या खोलीत अनेक डॉक्टर उपस्थित होते, त्यात पुरुष डॉक्टरांचाही समावेश होता. या तपासणीदरम्यान माझी स्त्रीरोगविषयक (गायनॅकोलॉजिकल) तपासणीही करण्यात आली. त्या क्षणी माझ्या मनात एकच प्रश्न होता, मी जशी आहे, तशी माझी ओळख कागदोपत्री मान्य व्हावी. पण यासाठी मला माझ्या शरीराचा पुरावा का द्यावा लागत आहे? हा संपूर्ण अनुभव माझ्यासाठी अत्यंत अस्वस्थ करणारा आणि माझ्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करणारा होता. त्या वेळी मी स्वतःला खूप असुरक्षित समजत होते.’

View this post on Instagram

A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

अनायाने पुढे सांगितले की, ‘मी हा अनुभव सांगत आहे कारण अनेकांना ही प्रक्रिया किती कठीण आणि भावनिकदृष्ट्या त्रासदायक असू शकते, याची कल्पना नसते. माझी अपेक्षा एवढीच आहे की, एखाद्या व्यक्तीला कायदेशीर ओळख देताना तिच्या सन्मानाचा, गोपनीयतेचा आणि प्रतिष्ठेचा पूर्ण आदर केला जावा.’ दरम्यान अनायाच्या या व्हिडिओवर अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. अशा प्रकारची प्रक्रिया कोणालाही सहन करावी लागू नये असं विधान काहींनी केले आहे.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....