AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WT20 World Cup ENG vs AUS अंतिम फेरीची लढत, नाणेफेकीने कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने; घेतला असा निर्णय

आयसीसी वुमन्स टी२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने आले आहेत.

WT20 World Cup ENG vs AUS अंतिम फेरीची लढत, नाणेफेकीने कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने; घेतला असा निर्णय
| Updated on: Jul 05, 2026 | 9:05 PM
Share

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला. क्षणाचाही विलंब न करत ऑस्ट्रेलिय कर्णधार मोलिन्यूने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  ऑस्ट्रेलियाची कर्णधार मोलिन्यू नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर म्हणाली की, ‘आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहोत. सुंदर दिवस आहे, त्यांच्यावर सुरुवातीलाच दबाव आणायचा आहे. खेळपट्टीमध्ये फारसा बदल होईल असे वाटत नाही. काही बदल नाहीत. कालच्या सरावानंतर पेझ (पेरी) बरी झाली. खास दिवस आहे. मुलींना दोन दिवसांची सुट्टी मिळाली. गेल्या दोन दिवसांपासून सराव सुरू केला आहे.’ ऑस्ट्रेलियाने यापूर्वी सहा वेळा जेतेपद मिळवलं आहे. आता सातव्या जेतेपदाची उत्सुकता आहे.

इंग्लंडची कर्णधार सायव्हर-ब्रंट म्हणाली की, ‘खरं तर मी सुद्धा गोलंदाजी करणार होते.  ही एक नवीन खेळपट्टी आहे. अंतिम सामन्यात धावफलकावर धावा असणे, ही काही वाईट गोष्ट नाही. त्यामुळे फलंदाजी करण्यात आनंद आहे. संघात कोणताही बदल नाही.’ संघाचे नेतृत्व करताना शार्लट एडवर्ड्स आणि हेदर नाईट यांच्यासह संघातील अनुभवाचा उपयोग करण्याबद्दल काय वाटते? या प्रश्नावर ब्रंट म्हणाली की, ‘म्हणजे, त्या अनुभवाचा आधार न घेणे आणि मग त्याला माझा स्वतःचा वेगळा टच देण्याचा प्रयत्न न करणे, हे माझ्यासाठी मूर्खपणाचे ठरेल. पण हो, मला वाटते की या संपूर्ण स्पर्धेत संपूर्ण संघाने वेगवेगळ्या मैदानांचा, वेगवेगळ्या परिस्थितींचा, वेगवेगळ्या दबावांचा अनुभव घेतला आहे. आणि या प्रवासात आम्ही खूप चांगला क्रिकेट खेळलो आहोत. त्यामुळे, हो, आशा आहे की आज आम्ही पुन्हा तेच करू शकू.’ इंग्लंडला अंतिम सामना जिंकण्यासाठी काय निर्णायक ठरेल? नॅट सायव्हर-ब्रंट म्हणाली की,  मला वाटतं, प्रतिस्पर्ध्यांपेक्षा एक धाव जास्त.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): एमी जोन्स (यष्टीरक्षक), डॅनी वायट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), अॅलिस कॅप्सी, हेदर नाइट, फ्रेया केम्प, डॅनिएल गिब्सन, शार्लट डीन, लिन्से स्मिथ, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन बेल.

ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): जॉर्जिया वोल, बेथ मूनी (यष्टीरक्षक), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, ॲशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, ॲनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मोलिन्यू (कर्णधार), किम गार्थ, लुसी हॅमिल्टन

Follow Us
नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवार...
Chandrashekhar Bawankule : नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?