AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका? खळबळजनक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, त्या चौथी पास…

मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, एक कॉल रेकॉर्डिंग चांगलीच व्हायरल झाली असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका? खळबळजनक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, त्या चौथी पास...
manoj jarange patilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 05, 2026 | 7:49 PM
Share

मोठी बातमी समोर आली आहे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्याची एक  कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे, या कॉल रेकॉर्डिंगमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ‘त्या चौथी पास जरांगेला तर गोळी मारायला लागतेय’ असे म्हणत या कॉल रेकॉर्डिंगमध्ये जरांगे पाटील यांना शिविगाळ देखील करण्यात आली आहे. या कॉल रेकॉर्डिंगची कोणतीही पुष्ठी टीव्ही 9 मराठी करत नाही. विलास घुले हत्या प्रकरणासंदर्भातील ही कॉल रेकॉर्डिंग असल्याची माहिती समोर येत आहे.

विलास घुले खुन प्रकरणानंतर बीडमधलं वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर रमेश घुले विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत आणि वाल्मीक कराड सोबत असलेल्या फोटो वरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. खासदार बजरंग सोनवणे यांचे परळीतील समर्थक बाळासाहेब पाथरकर यांनी रमेश घुलेंवर एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यानंतर  एका व्यक्तीने बाळासाहेब पाथरकर यांना फोन केला. फोनवरून बोलताना त्या व्यक्तीने थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच शिविगाळ देखील केली आहे. ‘त्या चौथी पास जरांगेला तर गोळी मारायला लागतेय’ असं या व्यक्तीने म्हटलं आहे. ही कथित कॉल रेकॉर्डिंग चांगलीच व्हायरल झाली आहे, या कॉल रेकॉर्डिंगमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय आहे विलास घुले प्रकरण

बीडच्या केज तालुक्यातील टाकळी गावाचा रहिवासी असलेला तरुण विलास घुले याची काही दिवसांपूर्वी हत्या झाली, या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला. विलास घुले हा हॉटेल व्यावसायिक होता. दोन गटात सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेला असता, त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला, या घटनेत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. मात्र या तरुणाच्या हत्येनंतर आत बीड जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा चांगलंच तापलं आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ