घरं कोसळतील… दुर्घटना घडेल… लोकं मरतील…. कुणाला वाटतेय मृत्यूची भीती? कोण बनलंय कुणाचा काळ?
Residents are afraid of death : जगातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या शहरातील लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. येथील लोकांना मरणाची भीती सतावत आहेत. कोण या शहरातील नागरिकांच्या जीवावर उठले आहे?

उत्तर प्रदेशातील मथुरामधील लोक सध्या भयभीत आहे. येथे केव्हा घर खचेल, ते कोसळेल आणि त्या खाली दबून मृत्यू होईल हे काही सांगता येत नाही. मथुरामधील विकासनगर कॉलनीतील लोकांना मृत्यूची भीती वाटत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, कोण या लोकांच्या जीवावर उठलं आहे? तर लोकांचा आरोप आहे येथील नगरसेवक गुलशन जाटव हेच लोकांच्या जीवावर उठले आहेत. येथे विकासाच्या नावाखाली केवळ फसवणूक करण्यात आली. लोकांच्या समस्या, अडचणी जशाच तशाच आहेत. लोकांच्या मदतीसाठा आता एकही जनप्रतिनिधी येत नाही. त्यांच्या घरांचा पाया खचत आहे, पण कुणालाच त्याचे काही पडलेले नाही.
भगवान श्रीकृष्णाच्या नगरीत लोक भयभीत
मथुरा ही भगवान श्रीकृष्णाची नगरी आहे. हे एक धार्मिक स्थळ पण आहे. पण येथे विकासाच्या नावाखाली लोकप्रतिनिधींचाच विकास झाला. वॉर्ड अधिकारी असो वा इतर प्रशासनातील बाबू, हेच लोक गब्बर झाले. येथे ना रस्ते ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक भागात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. अनेक भागांना या पाण्याचा फटका बसला. जुन्या घरांची माहिती वाहून गेली. काही ठिकाणी जमीन खचली. जुनी घरं पडली. मलबा तसाच राहिल्याने पावसाचे पाणी साचले. त्यामुळे इतर घरांना सुद्धा त्याचा फटका बसला. येथील घरं खचण्याच्या घटना वाढल्या. पावसाळ्यात या भागात उत्तराखंड राज्यासारखी पुरस्थिती तयार झाली होती. पण त्याची दखल कोणीच घेतली नाही.
या भागात नागरी समस्या, अडचणींचा डोंगर तयार झाला आहे. या ठिकाणी अगोदरच्या नगरसेवकांना आणि नंतरच्या नगरसेवकाने स्वत:च्या विकासा पलीकडे कुणाचाच विकास केला नाही. वॉर्ड क्रमांक 16 मध्ये अडचणी आणि समस्या दूर करण्यासाठी नगरसेवकाकडे वेळ नाही. येथील अनेक घरांची पडझड झाली आहे. तर आता उंच ठिकाणावरील घरांचा भराव खचल्याने येथील नागरीक जीव मुठीत धरून रात्र काढत आहेत. जमिनीचा हा उंच भाग केव्हा झरझर खाली घसरेल हे सांगताच येत नाही. भीतीपोटी काही नागरिकांनी दुसर्या ठिकाणी आश्रय घेतला आहे.
घरं पडतील, मोठी दुर्घटना होईल, लोक मरतील
येथे घरं पडतील. मोठी दुर्घटना होईल, लोक मरतील, तेव्हा प्रशासनाला कदाचित जाग येईल असा रोष स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. पाऊस जसा सक्रिय झाला आहे. तसे येथील लोक भयभीत झाले आहेत. पावसाळ्यात येथील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप येते. त्यामुळे येथील घरं खचतील आणि त्यात एखाद्याचा जीव जाईल अशी भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. या जुन्या टेकडीवरील अनेक घरांचा पाया खचला आहे. अनेक जण मकान सोडून दुसरीकडे गेले आहेत.
