हॉटेलच्या बाथरूमचे दार उघडताच भयंकर समोर, थेट उडाला थरकाप, टॉयलेटच्या सीटवर..

नुकताच एक धक्कादायक घटना घडली. पाच मित्र फिरण्यासाठी गेले. त्यांनी एका रिसोर्टमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र, या पाचही जणांनी ज्याचा विचार केला नाही, अशी गोष्टी त्यांच्यासोबत घडली. बाथरूम उघडताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

हॉटेलच्या बाथरूमचे दार उघडताच भयंकर समोर, थेट उडाला थरकाप, टॉयलेटच्या सीटवर..
Bathroom
| Updated on: May 16, 2026 | 10:05 AM

एक धक्कादायक घटना पुढे आली, ज्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. एक व्यक्ती बाथरूममध्ये गेला. बाथरूमसाठी बसत असतानाच त्याला काहीतरी दिसले. त्याने एक छोटी काडी आणली आणि नक्की काय आहे, हे पाहत होता. त्यानंतर काही सेकंदात असे काही घडले की, उपस्थितांना धक्काच बसला. टायलेटच्या भांड्यात असे काही निघेल, याचा विचारही कोणी केला नाही. टॉयलेटचे भांडे उघडताच सर्वांना मोठा धक्का बसला. पाच मित्र फिरण्याकरिता गेले होते. एका रिसोर्टमध्ये ते थांबले. त्यापैकी एकजण बाथरूममध्ये गेला आणि त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. द सन च्या रिपोर्टनुसार, नॉर्दर्न नेग्रोस नेचुरल पार्कमध्ये मित्र फिरण्याकरिता गेले होते.

यादरम्यान एक मित्र बाथरूममध्ये गेला आणि त्याने टॉयलेटचा फ्लश ठीक होत नसल्याने दुसऱ्या एका मित्राला बोलावले. त्याने वारंवार फ्लश केले पण पाणी जात नव्हते. त्यानंतर काहीतरी काळे दिसू लागले. या मित्रांनी थेट एक छोटी काडी आणली. त्या काळा वस्तूला हलवत होते. मात्र, यादरम्यानच थेट टॉयलेटच्या भांड्यातून किंग कोबराच बाहेर आला. हा किंग कोबरा कॅमेऱ्याकडे पाहून जीभ दाखवतानाही दिसला.

सापाला बघताच काय करावे, हे कोणालाही कळत नव्हते. धक्कादायक म्हणजे साप भांड्यातून बाहेर येण्यासाठी पुढे सरकत होता. तो कॅमेऱ्याकडे बघत बघत भांड्यातून बाहेर येण्याकरिता पुढे सरकू लागला. त्यापैकी एकाने हिमत दाखवत थेट टॉयलेटचे झाकण लावले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. किंग कोबरा हा जगातील सर्वात घातक आणि विषारी सापांपैकी एक आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात अनेकदा किंग कोबरा दिसला आहे. सध्या प्रचंड उन्हाळा असल्याने साप बाहेर येतात आणि थंड ठिकाण शोधतात. हा साप पाईपाच्या मदतीने टॉयलेटच्या भांड्यात पोहोचल्याचा अंदाज आहे. मात्र, या घटनेने एकच खळबळ उडाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हे पाचही मित्र फिलीपींसमध्ये सुट्ट्या घालवण्याकरिता पोहोचले होत, त्यावेळीच ही घटना घडली.

Follow Us