चादरीसहित तो वधू वराच्या अंगावर पडला, चादर काय सोडली नाही! लग्नमंडपातील व्हिडीओ तुफान व्हायरल

तिसऱ्यांदा तांदूळ हवेत फेकताच ते दोन्ही बाजूंनी चादर ओढायला सुरुवात करतात. या घटनेत डाव्या बाजूची व्यक्ती त्या चादरीसहित वधू वराच्या अंगावर जाऊन पडते.

चादरीसहित तो वधू वराच्या अंगावर पडला, चादर काय सोडली नाही! लग्नमंडपातील व्हिडीओ तुफान व्हायरल
marriage video
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 17, 2023 | 11:10 PM

अनेकदा लग्नात अशा घटना घडतात, ज्या वर्षानुवर्षे लक्षात राहतात. वधू-वर मंडपात बसलेले असताना अनेकदा काही जण विधी करण्याच्या प्रक्रियेत अशा गोष्टी करतात ज्या बघून खूप हसू येतं. इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोक हसून वेडे झालेत. खरंतर लग्नादरम्यान वधू-वर मंडपात बसलेले असतात आणि मग एक विधी केला जातो ज्यामध्ये पांढऱ्या रंगाची चादर सोबत ठेवावी लागते, पण या दरम्यान अशी काही घटना घडली की सर्वजण ही विधी करताना पडतात, तेही वधू वराच्या अंगावर!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही वधू-वर मंडपात बसलेले पाहू शकता. या दरम्यान एक विधी केला जातो, ज्यामध्ये वधू-वर असे दोन्ही बाजूचे दोन लोक पांढरी चादर घेऊन त्यावर तांदूळ टाकतात आणि तीन वेळा वर फेकतात.

तिसऱ्यांदा तांदूळ हवेत फेकताच ते दोन्ही बाजूंनी चादर ओढायला सुरुवात करतात. या घटनेत डाव्या बाजूची व्यक्ती त्या चादरीसहित वधू वराच्या अंगावर जाऊन पडते. वधू वर जमिनीवर आडवे होतात, बघून खूप हसू येईल.

सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे लग्नमंडपात विधी पार पाडण्याच्या प्रक्रियेत तो तरुण इतका गुंतलेला आहे की त्याला वधू-वर पडल्यावरसुद्धा काही एक फरक पडत नाही. वधू-वर बराच वेळ जमिनीवर पडले. काही सेकंदाच्या या व्हिडिओने लोकांना आश्चर्यचकित केले.

इन्स्टाग्रामवर नेप्टिकटॉक नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 31 डिसेंबरला शेअर झाल्यापासून आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे, तर हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “भाऊ, वधू-वर पडले आहेत, तुम्ही काय करत आहात.”