VIDEO : ऑडीतून चहाची विक्री करणारा पाहिलाय का ?, व्हिडीओ व्हायरल

मार्केटींगसाठी नवनवीन संकल्पना राबविणारे आपल्याकडे काही कमी नाहीत, आता एकाने आपल्या अत्यंत महागड्या ऑडीमधून चहा विक्रीचा धंदा सुरू केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

VIDEO : ऑडीतून चहाची विक्री करणारा पाहिलाय का ?,  व्हिडीओ व्हायरल
audi-car-CHAIWALA
Image Credit source: socialmedia
| Updated on: Apr 09, 2023 | 12:37 PM

viral video : सोशल मिडीयावर दररोज नवनवीन व्हिडीओ शेअर केले जात असतात. अलिकडेच एका युजरने असाच एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे तो पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. या व्हिडीओमध्ये एक युवक रस्त्याच्या कडेला अत्यंत महागड्या अशा आलिशान ऑडीकारमधून चहा विकताना पाहायला मिळत आहे. एकाने हा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओला सोशल मिडीयावर मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत.

मार्केटींगचा नवा फंडा म्हणून या महागड्या ऑडी गाडीतून चहा विक्री करण्याची कल्पना या तरूणाल सुचली आहे का असा सवाल निर्माण झाला आहे. अशी आयडीया आपला बिझनेस चांगला चालावा यासाठी तरूणांकडून वापरली जात असते. लक्झरी गाडीतून चहा विकण्याचा हा फंडा त्यासाठी वापरला गेला असावा असे वाटत आहे. या व्हिडीओला सोशल मिडीयावर मजेशीर प्रतिक्रीया आल्या आहेत.

एका युजरने प्रतिक्रीया देताना याला , ऑडी चायवाला असे नाव दिले आहे. तर इतर युवकांनी खूपच फनी कमेंट दिल्या आहेत. एकाने म्हटले आहे की ऑडी कार खरेदी केली आता हप्ते भरण्यासाठी चहा विकण्याची वेळ आली असे मजेने म्हटले आहे. अन्य एका युजरने म्हटले आहे की कारचा मालक ऑडीमधून चहा विकून मर्सिडीज-बेंझ जी वॅगन खरेदी करण्याची योजना आखत आहे. तर एका युजर म्हटलेय की याने चहा विकून कार खरेदी केली आहे की उलटे झाले आहे.

 

आशिष त्रिवेदी ashishtrivedii_24 यांनी हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. रस्त्याच्याकडेला पांढऱ्या ऑडीकारच्या पाटच्या डीकीमध्ये चहाचे दुकान उघडलेले दिसत आहे. दुकानदार चहाचे बाकडे लावून चहा विकताना दिसत असून ग्राहकमंडळी चहा पिताना दिसत आहेत. काही सेंकदाच्या या व्हिडीओमध्ये लक्झरी सेडानचे चहाच्या टपरीत रूपांतर झालेले दिसत आहे. इंटरनेटवर या व्हिडीओला शेअर केल्यानंतर त्याला १ लाख ५३ हजार लोकांनी लाईक्स केले आहे.