भर लग्नमंडपात नवरीसमोरच नवरदेवानं केलं असं काही, की मंगलअष्टकांऐवजी पडल्या शिव्या, वऱ्हाडी मंडळींना बसला धक्का

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, तरुणानं आपल्या लग्नात जे केलं ते पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हा तरुण सध्या प्रचंड ट्रोल होत आहे. हा व्हिडीओ बिहारमधील असल्याचं बोललं जात आहे.

भर लग्नमंडपात नवरीसमोरच नवरदेवानं केलं असं काही, की मंगलअष्टकांऐवजी पडल्या शिव्या, वऱ्हाडी मंडळींना बसला धक्का
लग्नाचा व्हिडीओ व्हायरल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 06, 2025 | 8:43 PM

लग्नाच्या मंडपामध्ये सामान्यपणे मंत्रोच्चाराचा ध्वनी, नातेवाईकांची गडबड, होणाऱ्या पती-पत्नीचा उत्साह असं चित्र पहायला मिळतं. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एकदम या उलट परिस्थिती पहायला मिळत आहे. हा व्हायरल झालेला लग्नाचा व्हिडीओ बिहारच्या नवादा येथील असल्याची माहिती समोर येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ज्याचं लग्न होणार आहे, तो तरुण लग्न मंडपात बसलेला दिसत आहे. मात्र या तरुणाचं लक्ष आपल्या लग्नाकडे नाही तर दुसरीकडेच असल्याचं दिसून येत आहे. हा तरुण आपल्या होणाऱ्या पत्नीकडे देखील लक्ष देत नाही, तर तो मोबाईलमध्ये गेम खेळण्यात व्यस्त आहे, त्याचं सर्व लक्ष त्याच्या जवळ असलेल्या मोबाईल स्क्रिनवर आहे. हा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल झाला असून, संबंधित तरुणाला यावरून प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

मंडपात बसून खेळत होता फ्री फायर

समोर आलेला हा व्हिडीओ बिहारच्या नवादा जिल्ह्यातील असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे, की हा तरुण लग्नमंडपात बसला आहे, समोर पंडित मंत्र म्हणत आहेत, मात्र या तरुणाचं या सर्व गोष्टींकडे कुठेच लक्ष नाहीये. तो आपल्या मोबाईलवर फ्री फायर नावाचा गेम खेळण्यात व्यस्त आहे. स्वत:चं लग्न असून देखील या तरुणाचं यामध्ये लक्ष नव्हतं, तो हा गेम खेळण्यात एवढा गुंतून गेला होता की, आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे, याचं थोडं देखील भान या तरुणाला राहिलं नाही.

मात्र या व्हिडीओची अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही, जरी हा व्हिडीओ बिहारमधील असल्याचं बोललं जात असलं तरी देखील हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, आपल्या स्वत:च्याच लग्नात गेम खेळणारा हा तरुण नक्की कोण आहे. हे लग्न नेमकं कुठे होतं याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या तरुणाला ट्रोल केलं आहे, युजर्सचा पारा चांगलाच चढल्याचं पहायला मिळत आहे.