VIDEO | बिकिनीमध्ये फोटोशूट करणार्‍या मुलीला मुलगा पोज कशी द्यायची शिकवतोय, तेवढ्यात…

Viral Video : एक व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका जोडप्याला एक तरुण कशी पोज द्यायची हे दाखवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना हसू आवरत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

VIDEO | बिकिनीमध्ये फोटोशूट करणार्‍या मुलीला मुलगा पोज कशी द्यायची शिकवतोय, तेवढ्यात...
pose
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 15, 2023 | 1:02 PM

मुंबई : अनेकांना सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ (Trending Photography Pose Video) पाहायला अधिक आवडते. त्याचबरोबर अनेकजण असे व्हिडीओ शोधत असतात. मोबाईलवरती असा व्हिडीओ कधी समोर येईल हे कुणीचं सांगू शकत नाही. एकदा का मजेशीर व्हिडीओ भेटला की, लोकं ते पु्न्हा-पुन्हा पाहतात असं अनेकदा पाहायला मिळालं आहे. बिकिनीमध्ये फोटोशूट (Photoshoot) करणार्‍या मुलीला मुलगा कशी पोज (pose) द्यायची हे लांबून शिकवत आहे. हे पाहिल्यापासून अनेकांना हसू आवरतं नाही अशी स्थिती आहे.

जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जाता, त्यावेळी तिथं तुम्ही काही फोटो काढता, त्याचबरोबर काही रोमांचक व्हिडीओ सुध्दा काढत असता. त्यासाठी तुम्हाला अनोख्या पोज द्याव्या लागतात. काहीजण वेगवेगळ्या पोज सोशल मीडियावर शोधत असतात. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक कपल पाण्याच्या ठिकाणी व्हिडीओ आणि फोटो काढण्यासाठी उभं आहे. त्यांना एक तरुण पोज कशी द्यायची हे दाखवत आहे. तो तरुण त्यांना एका पेक्षा एक अधिक चांगल्या पोज शिकवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना हसू कंट्रोल होत नाही आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ यम्मी नावाच्या व्यक्तीने ट्विटरवरती शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहिला मिळतं की, एक तरुण त्या जोडप्याला कशी पद्धतीने मदत करीत आहेत. ज्या ठिकाणी जोडपं गेलं ते पाण्याचं ठिकाणं आहे. त्याचबरोबर तिथं जाऊन ते कपल रोमांटीक मूडमध्ये फोटो शूट करीत आहे. त्यावेळी लांबून पाण्यात उभं राहून एक तरुण त्यांना पोज शिकवत आहे. तरुण ज्या पद्धतीने सांगेत त्या पद्धतीने जोडपं फोटो काढत आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावरती हा व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी शेअर केला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “मला तेथे त्वरित जायचे आहे, कारण माझ्या सारख्या मार्गदर्शकाची त्यांना नितांत गरज आहे.”, दुसर्‍या नेटकऱ्याने लिहिले आहे की, “मी मार्चमध्ये तिथे होतो आणि मला खूप आश्चर्य वाटले.” अशा पद्धतीचे व्हायरल व्हिडीओ लोकांना अधिक आवडतात.