AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातातील मृतांची नावे जाहीर, मृतांमध्ये २०-२२ वर्षांचे तरुण

शनिवारी पहाटे मुंबई-पुणे महामार्गावर मोठा अपघात झाला. एक खासगी बस 500 फूट खोल दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांची नावे जाहीर झाली आहे. अपघातात 25 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.

पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातातील मृतांची नावे जाहीर, मृतांमध्ये २०-२२ वर्षांचे तरुण
bus accident
| Updated on: Apr 15, 2023 | 1:27 PM
Share

मुंबई, गिरीश गायकवाड : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीत खासगी बस कोसळली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटे 4 वाजता झालेल्या या भीषण अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे शहरातील जयंतीचा कार्यक्रम आटोपून येत असताना हा अपघात झाला. मुंबईतील गोरेगाव येथील बाजीप्रभू ढोल ताशा पथकातील तरुण या खाजगी बसमधून प्रवास करत होते. दरम्यान जखमींची चौकशी करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात आहेत.

कसा झाला अपघात

पुण्यावरून मुंबईला ही खासगी बस जात होती. पहाटे 4च्या सुमारास ही बस जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागे येताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे बाजूलाच असलेल्या दरीत ही खासगी बस कोसळली. ही दरी 400 ते 500 फूट खोल आहे. एवढ्या उंचावरून बस कोसळल्याने बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. या बसमधून 40 ते 45 प्रवाशी प्रवास करत होते.

ही आहेत नावे

  • १)जुई दीपक सावंत (वय १८, रा.दिंडोशी, गोरेगाव)
  • २)वीर कमलेश मांडवकर ( वय १२, रा.गोरेगाव)
  • ३)वैभवी सुनिल साबळे
  • ४) स्वप्निल श्रीधर धुमाळ (वय २०, रा.दिंडोशी, गोरेगाव)
  • ५)यश सुभाष यादव (वय १८, रा.गोरेगाव)
  • ६)सतिष श्रीधर धुमाळ (वय २३, रा.दिंडोशी, गोरेगाव)
  • ७) मनिष राठोड (रा.चेंबूर)
  • ८)हर्षदा परदेशी (रा.माहिम)
  • ९) कृतिक लोहित, वय १६ वर्ष, गोरेगाव, मुंबई
  • १०) अभय विजय साबळे, वय २० वर्ष, मालाड, मुंबई.
  • ११) राहुल गोठण, वय १७ वर्ष, गोरेगाव मुंबई.
  • १२) अनोळखी

हे आहेत जखमी

एमजीएम हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेल्या जखमींची नावे

  • 1)आशिष विजय गुरव, (वय 19 वर्षे, दहिसर मुंबई)
  • 2) यश अनंत संकपाळ, (वय 17 वर्ष, गोरेगाव, मुंबई)
  • 3) जयेश तुकाराम नरळकर,( वय 24 वर्षे, कांदिवली, मुंबई)
  • 4) वृषभ रवींद्र कोरमे, (वय 14 वर्षे, गोरेगाव, मुंबई)
  • 5) रुचिका सुनील डुमणे, (वय 17 वर्षे, गोरेगाव, मुंबई)
  • 6) आशिष विजय गुरव, (वय १९ वर्ष, दहिसर, मुंबई)
  • 7)ओंकार जितेंद्र पवार, (वय 25 वर्षे खोपोली, रायगड)
  • 8)संकेत चौधरी, ( वय 40 वर्ष,गोरेगाव, मुंबई)
  • 9)रोशन शेलार, (वय 35 वर्ष, मुंबई)
  • 10)विशाल अशोक विश्वकर्मा, (वय 23 वर्ष, गोरेगाव, मुंबई
  • 11) निखिल संजय पारकर, (वय 18 वर्ष, मुंबई)
  • 12) युसुफ मुनीर खान, (वय 13 वर्ष, मुंबई )
  • 13) कोमल बाळकृष्ण चिले, (वय 15 वर्ष, सांताक्रुज, मुंबई)
  • 14) अभिजीत दत्तात्रेय जोशी (वय 20 वर्षे, गोरेगाव मुंबई)
  • 16) मोहक दिलीप सालप, (वय 18 वर्षे, मुंबई)
  • 17) दीपक विश्वकर्मा, (वय २०वर्ष, गोरेगाव, मुंबई)
  • 18) सुरेश बाळाराम अरोमुक्कंम, (वय १८ वर्ष, गोरेगाव,मुंबई)

खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमधील जखमींची नावे

  • १) नम्रत रघुनाथ गावनुक, (वय १८ वर्ष, गोरेगाव, मुंबई)
  • २) चंद्रकांत महादेव गुडेकर, (वय 29 वर्ष, गोरेगाव, मुंबई)
  • ३) तुषार चंद्रकांत गावडे, (वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई)
  • ४) हर्ष अर्जुन फाळके, (वय 19 वर्ष, विरार)
  • ५) महेश हिरामण म्हात्रे, (वय २० वर्षे, गोरेगाव, मुंबई)
  • ६) लवकुश रणजीत कुमार प्रजापति, (वय 16 वर्ष, गोरेगाव, मुंबई)
  • ७) शुभम सुभाष गुडेकर, (वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई )
  • ८)ओम मनीष कदम, (वय १८, गोरेगाव, मुंबई)
  • ९) मुसेफ मोईन खान, (वय २१ वर्ष, गोरेगाव, मुंबई)

खाजगी रुग्णालय जाकोटिया रुग्णालयतील जखमी

  • १) सनी ओमप्रकाश राघव, (वय २१, खोपोली,रायगड)
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.