Video : उंदीरमामा की हरीण कोण आहे हा विचित्र प्राणी, कुठे सापडला दुर्मिळ जीव

| Updated on: May 31, 2023 | 8:40 PM

आपल्या पृथ्वीवर इतकी जैवविविधता आहे की अनेक सजीवांपासून कदाचित आपण अजूनही अनभिज्ञ असू शकतो. आता उंदरासारखा दिसणारा हा प्राणी दुर्मिळ हरीण आहे हे कळल्यावर तुम्हाला धक्काच बसेल नाही का !

Video : उंदीरमामा की हरीण कोण आहे हा विचित्र प्राणी, कुठे सापडला दुर्मिळ जीव
Rare mouse-deer
Image Credit source: ANI
Follow us on

नवी दिल्ली : तुम्ही कधी असा प्राणी पाहीला आहे का ? ज्याच्या आकार उंदराचा आणि त्वचा हरीणासारखी असेल…नाही ना ? हो आपली पृथ्वी आणि सजीव सृष्टी इतकी वैविध्यपूर्ण आहे की अनेक जीव आपण अजून पाहीलेले नसतील. हा व्हिडीओत दिसणारा प्राणी उंदीर, हरीण किंवा एखादे जंगली डुक्कर नसून याचे नाव आहे ‘माऊस डीयर’ ! ( Rare mouse-deer ) हा अनोखा दुर्मिळ प्राणी छत्तीसगडच्या कांगेर घाटी नॅशनल पार्कमध्ये सापडला आहे. हा प्राणी उंदीर मात्र नक्कीच नाही तर ही आहे हरीणाची एक अनोखी जात…

आपली सजीवसृष्टी कित्येक प्रकारचे वनस्पती आणि सजीव प्राणी आहेत. याची काही गणतीच करु शकत नाही. अशात छत्तीसगडच्या कांगेर घाटी जंगलातील राष्ट्रीय उद्यानातील कॅमेऱ्यांत हा चिमुकला ‘माऊस डीयर’ सापडला आहे. या अनोख्या प्राण्याला उंदीरासारखा आकार असला तरी शरीरावर हरीणासारखे पट्टे आहेत. शिवाय तोंड आणि पुढील पायांचा आकारही वेगळा आहे. या प्राण्याची पाय, शेपटी हरीणासारखी असून चालण्याचा अंदाजही हरीणासारखाच असतो.

माऊस डीअरचा व्हिडीओ येथे पाहा…

या अनोख्या जीवाचा व्हिडीओ ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ट्वीटर पोस्ट केला आहे. भारतात आढळणाऱ्या हरणाच्या 12 प्रजातीपैकी माऊस डीयर जगातील सर्वात लहान हरीणाची जात आहे. हे प्राणी अशा जंगलात राहणे पसंद करतात जेथे ओलसरपणा आणि आद्रता जादा आहे. हरीणासारख्या दिसणाऱ्या या प्राण्याला डोक्यावर शींगे नसतात. कांगेर खोऱ्यातील या अनोख्या सजीवाचा व्हिडीओ पाहा..