AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप,पठ्ठ्याने कंपनीच विकली; मिळाले इतके पैसे की आयुष्यभर काम करण्याची गरजच नाही, 33 वर्षांचा भारतीय तरूण फारच चर्चेत

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाला म्हणून एका तरुणाने चक्क आपली कंपनीच विकली अन् यामुळे तो रातोरात अब्जाधीश झालाय. एवढच नाही तर आता एवढ्या पैशांचं नक्की मी करू काय असा प्रश्न त्याने सोशल मीडियावर एक ब्लॉगच्या माध्यमातून विचारला आहे.

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप,पठ्ठ्याने कंपनीच विकली; मिळाले इतके पैसे की आयुष्यभर काम करण्याची गरजच नाही, 33 वर्षांचा भारतीय तरूण फारच चर्चेत
| Updated on: Jan 06, 2025 | 7:56 PM
Share

गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यावर साधारणपणे लोकं गाणी ऐकतात, बाहेर एकांतात बसतात किंवा मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवतात. पण एका पठ्ठ्याने असं काही केलं की कोणालाही धक्काच बसेल.

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याने चक्क कंपनीच विकली

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याने एका मुलाने चक्क त्याची कंपनीच विकली. आता तुम्हाला हे वाचून वाटलं असेल की याने किती मोठं नुकसान करून घेतलं स्वत:चं. पण खरंतर यापेक्षा थोडं उलट घडलं आहे. कारण या मुलाने ब्रेकअप झाल्याच्या दु:खात आपली कंपनी विकली पण त्यानंतर त्याला एवढा पैसा मिळाला की त्याला पुन्हा कधी काम करण्याची गरजच नाही.

होय, हे खरं आहे. या मुलाला एवढा पैसा मिळाला की चक्क आता त्याला प्रश्न पडला आहे की एवढ्या पैशांच करायचं काय? या तरुणाचे नाव आहे विनय हिरेमथ. 33 वर्षीय विनय हिरेमथ हा भारतीय वंशांचा उद्योजक असून तो अमेरिकेत वास्तव्यास आहे. विनय हा ‘लूम’ नावाच्या कंपनीचा सहसंस्थापक आहे. त्याने आपली ही स्टार्टअप कंपनी सन 2023 मध्ये 975 मिलियन डॉलर्सला विकली.

रातोरात अब्जाधीश

आपल्या प्रेयसीबरोबर ब्रेकअप झाल्यानं विनयने कंपनी विकली. विशेष म्हणजे विनयने आपली कंपनी काही कोटींना नाही तर तब्बल 975 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 8368 कोटी रुपयांना विकली आहे. त्यामुळे त्याने आता एक ब्लॉग लिहून एवढ्या पैशांचं काय करु असं विचारलं आहे, तसेच नेमकं आयुष्यात काय काय घडतंय याबद्दलही सांगितलं आहे.

विनयच्या कंपनीला एटलसियन या कंपनीने विकत घेतलं. या व्यवहारामुळे रातोरात विनय अब्जाधीश झाला. विनयने याबाबतच एक लांबलचक ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगमध्ये विनयने त्यांच्या आयुष्यात होत असलेल्या बदलांवरही भाष्य केलं आहे.

त्याने ब्लॉगमध्ये लिहिलं आहे, “मी फार श्रीमंत झालो आहे. आता मी माझ्या आयुष्यात काय करु हे मला कळत नाहीये. मागील वर्ष माझ्यासाठी फारच खडतर होतं. मागील वर्षी मी कंपनी विकल्यानंतर आता स्वत:ला फार अवघडलेल्या अवस्थेत पाहतोय,” असं म्हणत त्याने त्याच्याकडील पैशांचे स्वरुप सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Vinay Hiremath (@vhmth)

“आयुष्यभर कोणतंही काम करण्याची गरज नाही”

विनय पुढे म्हणाला, “मला आता आयुष्यभर कोणतंही काम करण्याची गरज नाहीये. मला प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन्य जाणवतंय पण त्यात प्रेरणा घेण्यासारखं काही नाहीये. मी आताच एवढा पैसा कमवला आहे की या पैशांचं काय करायचं मला कळत नाहीये. प्रेयसीबरोबरीच दोन वर्ष फार छान गेली. मात्र असुरक्षित वाटत असल्याने आमचं ब्रेकअप झालं. हे फारच दु:खद होतं. मात्र निर्णय घेणं योग्यच होतं,” असं म्हणतं विनयने त्याच्या रिलेशनशिपबद्दल, त्याच्या ब्रेकअपबद्दल वैगरे सांगितलं आहे.

विनयला एलन मस्कप्रमाणे व्हायचंय

एवढच नाही तर, विनयच्या ‘लूम’ कंपनीला विकत घेणाऱ्या कंपनीने त्याला सीटीओ म्हणजेच मुख्य तांत्रिक अधिकारी होण्यासाठी 60 मिलियन डॉलर्सच्या पॅकेजसहीत जॉब ऑफर केला होता. मात्र त्याने समोर आलेल्या या जॉब ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नसल्याचंही विनयने म्हटलं आहे. विनयला एलन मस्कप्रमाणे व्हायचं असल्याची इच्छा त्याने ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान अगदी कमी वयात आपल्या मेहनतीने यशस्वी झालेले आणि आपल्या बळावर आपला उद्योगाला प्रचंड मोठं करणारे अल्पवधीत अब्जाधीश होतात. अशाच तरुणांपैकी एक म्हणजे विनय हिरेमथ आहे असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. विनयच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटस् केल्या आहेत.

सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष.
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?.
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र.
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?.
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना.
काय तो विजय, सगळं OK... शहाजी बापूंची खास डायलॉगबाजी, खेचून आणला विजय
काय तो विजय, सगळं OK... शहाजी बापूंची खास डायलॉगबाजी, खेचून आणला विजय.
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.