Viral: माणूसच काय प्राण्यांना सुद्धा आवडतात स्वतःच्या मनातलं ओळखणारे! तिने ‘यातच’ करिअर करायचं ठरवलं, आज घेते ‘इतके’ पैसे

ज्यामुळे ते स्वतःची ओळख निर्माण करतात. असंच काहीसं या महिलेचं वैशिष्ट्य आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील रहिवासी असलेल्या या महिलेचे नाव निक्की वास्कोनीझ असं आहे. या बाईच्या या खासियतीमुळेच तिनं आपलं करिअर बनवलंय.

Viral: माणूसच काय प्राण्यांना सुद्धा आवडतात स्वतःच्या मनातलं ओळखणारे! तिने यातच करिअर करायचं ठरवलं, आज घेते इतके पैसे
निक्की वास्कोनेझ
Image Credit source: facebook
| Updated on: Jun 12, 2022 | 1:27 PM

माणूस प्राण्यांशी बोलतो असं कधी तुम्ही पाहिलंय का? बरं, चला मान्य की लोकं आपल्या प्राण्याशी (Animals) बोलतात आणि तेच तुम्ही कधी पाहिलंत. पण… माणूस कुठल्याही आणि कुणाच्याही प्राण्याशी बोलतो, इतका बोलतो, त्याला इतकं प्राण्यांच्या मनातलं कळतं की तो ते प्रोफेशन म्हणूनच घेतो असं कधी पाहिलंय का? जगात (World) असे खूप खूप लोकं आहेत ज्यांचे खूप वैशिष्ट्य आहेत. ती पण वेगवेगळी, त्यातच हे येतं. ज्यामुळे ते स्वतःची ओळख निर्माण करतात. असंच काहीसं या महिलेचं वैशिष्ट्य आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील रहिवासी असलेल्या या महिलेचे नाव निक्की वास्कोनीझ असं आहे. या बाईच्या या खासियतीमुळेच तिनं आपलं करिअर (Career) बनवलंय.

हे आहे वैशिष्ट्य

निक्की वास्कोनेझ नावाची एक स्त्री प्राण्यांशी बोलते. बरं आता ही नुसती बोलत नाही, तर ती त्यांचं हृदयही समजून घेते. असे अनोखे वैशिष्ट्य असलेल्या लोकांना प्राणी कुजबुजणारे व्यावसायिक (Animal Whisperer) म्हणतात. अमेरिकेत राहणाऱ्या निक्कीला कुत्रे आणि मांजरांचे हृदय सहज समजते आणि तिने या कौशल्याला आपले करिअर बनवले आहे.

58 लाखांचे पॅकेज सोडून काम सुरू

एका अमेरिकन वृत्तपत्रानुसार, 33 वर्षीय निक्की व्हॅस्कोनेझ या आधी पूर्णवेळ प्रॉपर्टी लॉयर म्हणून काम करत होत्या. जिथे त्यांचं वार्षिक पगाराचे पॅकेज 58 लाख रुपये होते. पण, नोकरी करतानाच निकीने प्राण्यांच्या मानसशास्त्राबद्दल वाचायला सुरुवात केली. ज्यानंतर त्यांना हे काम चांगलेच आवडू लागले. यानंतर तिने वकिलाची नोकरी सोडली आणि स्वत:चे थेरपी क्लिनिक उघडून प्रोफेशनल थेरपिस्ट बनली.

निक्की तिच्या या निर्णयामुळे खूश आहे

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, निक्कीने सप्टेंबर 2020 मध्ये प्रोफेशनल थेरपिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ज्यासाठी तिने सोशल मीडियाचा आधार घेतला. ज्याचा तिला खूप फायदाही झाला. निक्की म्हणाली की ती तिच्या नवीन आणि सर्वात अनोख्या व्यवसायामुळे खूप आनंदी आहे. निक्की पुढे म्हणाली की, तिच्या जुन्या कामात तिला तासनतास काम करावं लागतं. पण आता तो बऱ्यापैकी खूश आहे. रिपोर्ट्सनुसार, निक्की एका सत्रासाठी सुमारे 27,000 रुपये घेते.