Viral : एका व्यक्तीच्या मागे लागला ऊंट, पुन्हा जे झालं ते पाहून हसू आवरणार नाही

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण व्हाल आणि हसू आल्याशिवाय राहणार नाही. कारण, एक ऊंट एका व्यक्तीला चांगलाच पळवतोय आणि भीतीपोटी त्या व्यक्तीची चांगलीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळतंय.

Viral : एका व्यक्तीच्या मागे लागला ऊंट, पुन्हा जे झालं ते पाहून हसू आवरणार नाही
Camel Chases Man
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 1:52 PM

मुंबई : सोशल मीडियावर अनेक मजेशिर गोष्टी शेअर केल्या जात आहेत. यातील काही व्हिडीओ पाहून हसू आल्याशिवाय राहत नाही, तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण व्हाल आणि हसू आल्याशिवाय राहणार नाही. कारण, एक ऊंट एका व्यक्तीला चांगलाच पळवतोय आणि भीतीपोटी त्या व्यक्तीची चांगलीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळतंय. (Camel chases a man, video goes viral on social media)

जर एखादा प्राणी कुणाच्या मागे लागला तर काय हालत होते, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता? अनेकांची भीतीने गाळण उडते. खासकरुन एखादा मोठा प्राणी तुमच्या मागे पडल्यास तर प्रकरण अजूनच गंभीर बनतं. आता जरा हा व्हिडीओही पाहा, एक व्यक्ती गाडी उभी करुन खाली उतरला तोच त्याच्या मागे ऊंट लागला. ऊंट त्या व्यक्तीच्या मागे धावतो. तो व्यक्ती गोल-गोल फिरत बसतो, तर तो ऊंटही त्या व्यक्तीच्या मागे धावत सुटतो. शेवटी तो व्यक्ती कारच्या आत घुसतो. सर्वात आधी तुम्ही हा व्हिडीओ पाहा…

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला थोडी हैरानी झाल्याशिवाय राहणार नाही, तसंच तुम्हाला मजाही येईल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाचत व्हायरल होतोय. फेसबुकवर या व्हिडीओला Egypt my beautiful home नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आलंय. बातमी लिहिण्यापर्यंत हा व्हिडीओ 14 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. तर 4 हजारापेक्षा जास्त लोकांनी तो लाईक केला आहे. इतकंच नाही तर या मजेशीर व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येत आहे.

संबंधित बातम्या :

Video | बलुचिस्तानमध्ये ‘तेरी मिट्टी’ गाण्याचा बोलबाला, अली बुगाटी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | अर्धनग्नावस्थेत चर्चवर चढला, आग लावण्याचा प्रयत्न, नंतर पोलिसांनी काय केलं ? पाहा व्हिडीओ

Camel chases a man, video goes viral on social media