World’s Ugliest Dog: शो क्युट! जगातलं सगळ्यात कुरूप कुत्रं पाहिलंत का? नाव चिहुआहुआ मिक्स, वय वर्षे 17

कोरोनामुळे या जत्रेचं आयोजन करता येत नव्हतं पण यंदा तब्बल दोन वर्षानंतर या "सोनोमा-मरिन" चं आयोजन करण्यात आलं आणि त्यात ही स्पर्धा घेण्यात आली.

Worlds Ugliest Dog: शो क्युट! जगातलं सगळ्यात कुरूप कुत्रं पाहिलंत का? नाव चिहुआहुआ मिक्स, वय वर्षे 17
नाव चिहुआहुआ मिक्स, वय वर्षे 17
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 28, 2022 | 11:37 AM

कॅलिफोर्निया: अमेरिकेतील ॲरिझोना येथील 17 वर्षीय चिहुआहुआ मिक्स (Chihuahua Mix) हा जगातील सर्वात कुरूप कुत्रा म्हणून ओळखला जात आहे. “सोनोमा-मरिन” (Sonoma Marin Fair) हा कार्यक्रम जवळपास 50 वर्षांपासून आयोजित केला जातो. ही एक कॅलिफोर्नियातील जत्रा आहे. कोरोनामुळे या जत्रेचं आयोजन करता येत नव्हतं पण यंदा तब्बल दोन वर्षानंतर या “सोनोमा-मरिन” चं आयोजन करण्यात आलं आणि त्यात ही स्पर्धा घेण्यात आली. मिस्टर हॅप्पी फेस या स्पर्धेचा विजेता ठरला. 17 वर्षीय कुत्र्याला (Dog) ट्यूमर आणि न्यूरोलॉजिकल समस्या आहेत. त्यामुळे त्याचा चेहरा थोडासा विद्रुप आहे. बऱ्याच इतर कुत्र्यांना हरवून चिहुआहुआ मिक्सने जगातल्या सर्वात कुरूप कुत्र्याचा किताब पटकावलाय.

वयाच्या 17 व्या वर्षी कुत्र्याने ही स्पर्धा जिंकली

या कुत्र्याला अनेक आजार आहेत त्यामुळे त्याला डायपरची गरज भासते, असं म्हटलं जातं. सरळ उभे राहण्यासाठी किंवा चालण्यासाठी धडपड करावी लागते आणि त्याचे डोके झुकते. विजेत्या कुत्र्याची नोंद इव्हेंटच्या वेबसाइटवर करण्यात आली आहे. चिहुआहुआ एकेकाळी खूपच वाईट अवस्थेत राहत होता, पण तरीही या कुत्र्याने वयाची 17 वर्षे गाठली. मिस्टर हॅपी फेस बनलेल्या या कुत्र्याला खेळायला खूप

“मिस्टर हॅपी फेस”ने अनेक स्पर्धकांचा पराभव केला

स्पर्धेत विजेत्या कुत्र्याला पाहून सर्व परीक्षकांच्या अंगावर शहारे आले. मिस्टर हॅपी फेस बीट करणाऱ्या या कुत्र्याची ज्यांच्याशी स्पर्धा होती ते इतर कुत्रे, त्यातला एक बिना केसांचा होता ज्याला एकही दात नव्हता, अजून एक खूपच लुकडा होता, एकाचं तर तोंड मोठं गोरिल्ला सारखं होतं. या इव्हेंटच्या वेबसाईटवर मिस्टर हॅपी फेसच्या मालकीण जेनेडा बेनेली यांचाही उल्लेख आहे. ती म्हणाली की ऑगस्ट 2021 मध्ये या कुत्र्याला कुटुंबीयांनी ॲरिझोना निवारा मधून दत्तक घेतले होते.

मला चेतावणी देण्यात आली होती…

जेनेडा बेनेली म्हणाली, “जेव्हा मी निवारागृहात पोहोचले, तेव्हा मी एक खास कुत्रा पाहण्यास सांगितले, जो सुदैवाने नुकताच दत्तक घेण्यात आला होता. तिथे आणखी एक कुत्रा होता तो खूप मोठा होता आणि त्याला आरोग्याच्या समस्या होत्या तो हाच होता. तरी मला चेतावणी देण्यात आली होती की तो खूप कुरूप आहे.पण मला चिहुआहुआ आवडला मग निवारा कर्मचाऱ्यांनी मला याची काळजी कशी घ्यावी हे समजावून सांगितले.”