Viral Video: चेहरा धुताच माणूस झाला गोरा, साबणाच्या जाहिरातीची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Viral Video: इंटरनेटवर ‘कोरियन व्हाइटनिंग सोप’शी संबंधित एक व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुमची त्वचा दूधासारखी गोरी होण्याचा दावा करण्यात आला आहे. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे.

Viral Video: चेहरा धुताच माणूस झाला गोरा, साबणाच्या जाहिरातीची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Soap Video
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 10, 2025 | 3:19 PM

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ‘कोरियन व्हाइटनिंग सोप’ (Korean Whitening Soap) ची कमाल दाखवण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये दावा केला जात आहे की हा साबण डोळ्यांचा पापणी लवण्याच्या आत ‘सन टॅन’ला टाटा बाय-बाय करुन तुमची त्वचा दूधासारखी गोरी बनवेल. पण, निकाल पाहिल्यानंतर नेटकरी खूपच मजा घेत आहेत.

काय आहे व्हिडीओ?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक सावळा माणूस हा ‘चमत्कारी’ साबण आपल्या चेहऱ्यावर चोळताना दिसतो. तो चेहऱ्यावर सर्वत्र हा साबण लावताना दिसत आहे. त्यानंतर तो चेहरा फुसताना दिसतो. समोर येणारा निकाल पाहून कोणाचेही डोळे विस्फारले जातील. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरचा साबण पुसल्यानंतर त्या व्यक्तीचा चेहरा इतका चमकदार आणि गोरा दिसू लागतो कोणालाही विश्वास बसणार नाही. जणू काही त्याची पूर्ण त्वचाच बदलली आहे. चेहरा आणि मानेच्या रंगात इतका स्पष्ट फरक दिसतो की पाहणारेही थक्क झाले आहेत. त्यासोबतच कंपनीने दावा केला आहे की एकदा वापरल्यानंतर तुम्ही ‘सुपर-डुपर गोरे’ व्हाल.

वाचा: एका आयटम साँगमुळे संपलं असतं माधुरीचं करिअर, बाळासाहेबांनी मिटवलेलं प्रकरण काय?

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून मात्र नेटकरी थक्क होण्याऐवजी उलट मजा घेऊ लागले आहेत. 46 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेल्या या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये मजेशीर टिप्पण्यांचा पूर आला आहे. नेटकरी कंपनीच्या दाव्यांना ‘ऑनलाइन स्कॅम’ आणि ‘फिल्टरची कमाल’ म्हणत खूप मजा घेताना दिसत आहेत.

एकाने चिमटा घेत म्हटले की, आता फेअर अँड लव्हलीचं काय होणार? दुसऱ्याने म्हटलं, किमान चांगला एडिटर तरी ठेवला असता. फिल्टर स्पष्ट दिसत आहे. आणखी एका युजरने कमेंट केलं, कोरियन्सनाही हे रहस्य माहीत नसेल. आणखी एकाने म्हटलं, हे तर चुकीचं आहे भाऊ. कोरियन लोक तसंही गोरे असतात भाऊ. त्यांना हा साबण बनवण्याची गरजच कशाला पडेल?