सरकारी अधिकाऱ्यावर “भुंकून” आंदोलन! कागदपत्रात असा काही घोळ झाला की या माणसाने आंदोलनच भुंकून केलं, Video

या 45 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये हा माणूस सरकारी अधिकाऱ्यांना कागदपत्र देतोय. हा अधिकारी गाडीत बसलेला आहे. कागदपत्र देताना हा माणूस कुत्र्यासारखा जोरजोरात भुंकताना दिसत आहे.

सरकारी अधिकाऱ्यावर भुंकून आंदोलन! कागदपत्रात असा काही घोळ झाला की या माणसाने आंदोलनच भुंकून केलं, Video
Man barks on BDOImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 20, 2022 | 2:47 PM

भारतात जितक्या पद्धतीचे आंदोलनं पाहायला मिळतील तितके तुम्हाला बाहेर कधीच असे आंदोलनं पाहायला मिळणार नाहीत. निषेध, आंदोलन, मोर्चे काढताना भारतीय लोक त्यातही आपली क्रिएटिव्हिटी दाखवतात. आता हे आंदोलन बघा. हा माणूस सरकारी अधिकाऱ्यावर भुंकलाय. त्याने बीडीओ वर भुंकून आंदोलन केलंय. का? कारण त्याचं आडनाव एका कागदपत्रात “दत्ता” ऐवजी “कुत्ता” झालंय म्हणून! होय.

पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यातील व्यक्तीने एका स्थानिक ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर विरोधात (बीडीओ) भुंकून आंदोलन केले. त्याचं रेशन कार्डवरील आडनाव ‘दत्ता’ ऐवजी ‘कुत्ता’ असं लिहिण्यात आलंय. हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात शेअर करण्यात आलाय.

या 45 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये हा माणूस सरकारी अधिकाऱ्यांना कागदपत्र देतोय. हा अधिकारी गाडीत बसलेला आहे. कागदपत्र देताना हा माणूस कुत्र्यासारखा जोरजोरात भुंकताना दिसत आहे.

पूर्ण स्लीव्ह शर्ट आणि पँट परिधान केलेल्या या व्यक्तीला संपूर्ण व्हिडिओमध्ये एकही शब्द उच्चारताना ऐकू येत नाही.

तो कारच्या खिडकीच्या बाजूला उभा आहे आणि बीडीओला कागदपत्रे दाखवताना दिसत आहे. तो अधिकारी दुसऱ्या व्यक्तीकडे ही कागदपत्रे सोपवतो. हिंदुस्थान टाईम्सने या संदर्भातली बातमी दिलीये.

एचटीने मिळवलेल्या रेशन कार्डच्या स्नॅपशॉटमध्ये त्या व्यक्तीचे नाव ‘दत्ता’ आडनावाऐवजी ‘श्रीकांती कुमार कुट्टा’ असे लिहिले आहे.

Kutta instead Dutta

Kutta instead Dutta

रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीने बांकुरा प्रशासनाच्या मदतीने अनेक वेळा आडनाव बदलण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला.

श्रीकांती यांनी एएनआयला सांगितले की, त्यांनी आपल्या रेशन कार्डवर आपले आडनाव दुरुस्त करण्यासाठी तीन वेळा अर्ज केला होता.

“तिसऱ्यांदा माझे नाव श्रीकांती दत्ताऐवजी श्रीकांती कुत्ता असे लिहिले गेले. यामुळे मी मानसिकरित्या व्यथित झालो होतो,” असं ते म्हणतात.

ते पुढे म्हणाले की, शुक्रवारी, ते पुन्हा दुरुस्तीसाठी अर्ज करण्यासाठी गेले होते आणि “तेथे संयुक्त बीडीओ पाहून, मी त्याच्यासमोर कुत्र्यासारखे भुंकू लागलो”.

“आमच्यासारखे सामान्य लोक किती वेळा काम सोडून दुरुस्तीसाठी अर्ज करायला जातील?” श्रीकांतने विचारले.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.