Viral Video: चुकूनही करू नका ‘पाण्यात हळद’ टाकण्याचा ट्रेंड, नाहीतर घरावर येईल संकट! ज्योतिषींचा धोकादायक इशारा
Water And Turmeric Trend: आजकाल सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड वेगाने पसरत आहे, जिथे लोक पाण्यात हळद मिसळून व्हिडिओ आणि रील बनवत आहेत. पण हा ट्रेंड घातक असल्याचे ज्योतिषांनी सांगितले आहे.

सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड खूपच गाजतोय. प्रत्येकजण रात्रीच्या गडद अंधारात पाण्यात हळद टाकत रील्स आणि व्हिडीओ अपलोड करतोय. पण असे करून ते लोक स्वतःसाठी संकट ओढवून घेत आहेत. हे आम्ही नाही, तर अरुण कुमार व्यास नावाच्या ज्योतिषींचे म्हणणे आहे, ज्यांनी या विचित्र ट्रेंडबाबत गंभीर इशारा दिला आहे. त्यांचा दावा आहे की, असे केल्याने तुम्ही केवळ नकारात्मक ऊर्जाच तुमच्या घरात आणत नाही, तर ही क्रिया भूत-प्रेतांना आमंत्रण देण्यासारखी आहे. ज्योतिषींचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटिझन्स संभ्रमात आहेत की, या ट्रेंडमध्ये उडी घेऊन त्यांनी काही धोक्याला आमंत्रण तर दिले नाही ना.
ज्योतिषी व्यास यांचा दावा आहे की, पाण्यात हळद मिसळणे ही कोणतीही सामान्य प्रक्रिया नाही, तर ती एक तांत्रिक क्रिया आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये लोकांना सावध करत सांगितले की, चुकूनही असे करू नये, कारण यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. इतकेच नाही, तर तुमच्यावर भूत-प्रेतांचा सायाही पडू शकतो.
View this post on Instagram
जन्मकुंडलीवर होईल परिणाम!
त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या कृतीमुळे तुमच्या जन्मकुंडलीतील चंद्र आणि गुरू ग्रह कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या नशिबावर वाईट परिणाम होऊ शकतो. शिवाय, यामुळे तुमची मानसिक स्थितीही बिघडू शकते. ज्योतिषींचा दावा आहे की, ही पूर्णपणे नुकसानकारक प्रक्रिया आहे, ज्यामुळे तुमच्या घरात संकट येऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टी टाळाव्या.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
पाण्यात हळद मिसळण्याच्या ट्रेंडवर ज्योतिषींचा हा इशारा देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरला आहे. अवघ्या काही तासांत तो ५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने चिंतेने लिहिले, “मी तर व्हिडिओ बनवला, आता काय करू?” दुसऱ्या युजरने लिहिले, “अनेक ज्योतिष तर पाण्यात हळद टाकून आंघोळ करण्यास सांगतात. कृपया उत्तर द्या.” आणखी एका युजरने कमेंट केली, “पाण्यात टाकून आंघोळ केल्याने काय होईल?”
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
