AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wedding Video : भर लग्नात नवरी घोरायला लागली; लग्नातील विचित्र प्रकाराने वऱ्हाडीही…

राजस्थानातील एका लग्नाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये नवरा आणि नवरी हवन जवळ बसलेली दिसत आहे. पूजा सुरू असून लग्नविधी सुरू असल्याचं दिसत आहे. नवरदेव शांतपणे सर्व विधी ऐकत आहे. तर पदर ओढून बसलेली नवरीही विधी ऐकत असल्याच्या अविर्भावात बसलेली दिसत आहे.

Wedding Video : भर लग्नात नवरी घोरायला लागली; लग्नातील विचित्र प्रकाराने वऱ्हाडीही...
WeddingImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 25, 2023 | 9:33 PM
Share

जयपूर | 25 डिसेंबर 2023 : घरात लग्नसराई असेल तर घरच्या मंडळींना लग्न होईपर्यंत डोळ्याला डोळा लागत नाही. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतोच. घरात प्रचंड धावपळ सुरू असते. पळापळ सुरू असते. बरं घरच्याच मंडळींची नव्हे तर नवरा आणि नवरीचीही तीच अवस्था असते. सतत पाहुण्यांचा राबता असल्याने आणि कोणी ना कोणी कोणत्याही वेळी भेटायला येत असल्याने त्यांच्याही डोळ्याला डोळा लागत नाही. त्यामुळे जो तो मग मिळेल तिथे एक डुलकी घेत असतो. एका लग्नाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नवरी चक्क मंडपातच डाराडूर झोपताना दिसत आहे. एकीकडे भटजीचा मंत्रोच्चार सुरू आणि दुसरीकडे नवरीचं घोरणं सुरू असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

राजस्थानातील एका लग्नाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये नवरा आणि नवरी हवन जवळ बसलेली दिसत आहे. पूजा सुरू असून लग्नविधी सुरू असल्याचं दिसत आहे. नवरदेव शांतपणे सर्व विधी ऐकत आहे. तर पदर ओढून बसलेली नवरीही विधी ऐकत असल्याच्या अविर्भावात बसलेली दिसत आहे. पण नवरी विधी ऐकत नसून डाराडूर झोपल्याचं लक्षात आल्यानंतर नवरदेव नवरीला खुणावतो. तेव्हा नवरी भांबावल्यासारखी जागी होताना या व्हिडीओत दिसत आहे. मात्र, नवरी झोपल्याचं पाहून नवरदेव संताप करण्याऐवजी मिश्किल हसताना दिसत आहे.

अन् पुन्हा सावरून बसली

नवरी झोपल्याचं लक्षात अल्यावर नवरदेव तिला हाताने खुणावत असल्याचं दिसतं. नवरदेवाने खुणावल्यानंतर नवरी जागी होते. पदर आणि साडी व्यवस्थित करते. त्यानंतर पुन्हा व्यवस्थित बसून विधी ऐकताना दिसत आहे. आपल्या देशात लग्न अत्यंत वाजतगाजत पार पाडलं जातं. पण लग्नाच्या दिवशी नवरी आणि नवरदेव किती तणावात असतात, त्यांची झोप पूर्ण झालेली असते का? त्यांना थकवा असतो का याची कुणाला काहीच पर्वा नसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर पॉझिटिव्ह प्रतिक्रिया येत आहेत. कुणीही निगेटीव्ह कमेंट करताना दिसत नाहीये.

लग्नाच्या दिवशी सर्व थकतातच

या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. इंटरनेटवरील हा सर्वात चांगला व्हिडीओ आहे. नवरदेवाची प्रतिक्रिया खूप चांगली आहे, असं एका यूजर्सने म्हटलंय. एक अनोखा आणि मन मोहून टाकणारा क्षण. ती हा क्षण कायम स्मरणात ठेवेल, असं दुसऱ्या यूजर्सने म्हटलं आहे. मला वाटतं मेकअपमुळे नवरी खूप थकलेली दिसतेय, असं एकाने तर नवरी खूपच थकलेली दिसतेय. लग्नाच्या दिवशी नवरा आणि नवरी दोघेही थकून जातात, असं आणखी एकाने म्हटलं आहे.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.