Viral Video : स्वत:च्या कपड्यांवर नाराज आहे नववधू; म्हणते, मला खूप खराब दिसतंय हे!!

सोशल मीडिया (Social Media)प्लॅटफॉर्मवर लग्नाशी संबंधित व्हिडिओंचा पूर आलाय. याचप्रकारचा एका नववधूचा व्हिडिओ (Video) इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यामध्ये नववधू तिच्या आउटफिटवर खूश नाही.

Viral Video : स्वत:च्या कपड्यांवर नाराज आहे नववधू; म्हणते, मला खूप खराब दिसतंय हे!!
नववधू
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 5:04 PM

देशात सध्या लग्नसराई सुरू आहे. सर्वत्र गाणं-नृत्य ऐकायला मिळतंय.अशा परिस्थितीत सोशल मीडिया (Social Media)प्लॅटफॉर्मवर लग्नाशी संबंधित व्हिडिओंचा पूर आलाय. यातील काही व्हिडिओ भावुक तर काही नववधूंच्या नखऱ्यांनी भरलेले दिसत आहेत. याचप्रकारचा एका नववधूचा व्हिडिओ (Video) इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यामध्ये नववधू तिच्या आउटफिटवर खूश नाही. मात्र होनीच्या ड्रेसमध्ये ती एखाद्या परीपेक्षा कमी दिसत नाही. पण तिचा ड्रेस खास आहे, असं तिला वाटत नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात, जे सर्वानांच आवडून जातात.

आउटफिटमध्ये सुंदर दिसतेय नववधू
या व्हिडिओमध्ये एक नववधू गाडीत बसलेली दिसत आहे. तिच्या आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या हातात फुलांचा गुच्छही बघायला मिळतो. पण वधू खूप अस्वस्थ आहे. त्याचं कारण तिची वेशभूषा. आता लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे, की ते सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

इन्स्टावर शेअर
व्हिडिओमध्ये नववधू म्हणताना ऐकू येतं, की माझा ड्रेस खूपच खराब आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही weddingsfever नावाच्या पेजवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओवर आतापर्यंत 10 हजारांच्या जवळपास लाइक्स आले असून, हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिननं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ग्रँड ड्रीम लेहेंगा खरेदी केल्यानंतरची प्रत्येक वधू.

केला प्रेमाचा वर्षाव

व्हिडिओवर लोकांच्या कमेंट्सही येतायत. एका यूझरनं कमेंट करत लिहिलं, की ही वधू खूप गोड आहे. दुसर्‍या यूझरनं लिहिलं, की तुमचा ड्रेस नक्कीच भारी आहे, तुम्ही त्यात खूप सुंदर दिसत आहात. काही यूझर्सनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये इमोजी शेअर करून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Covid 19 ऐकलं पण Covid 30 माहीत आहे का? वाचा Kovid Kapoor यांच्या नावाची रंजक कथा

ना कपूर, ना खान; हे अस्सल अहिराणी गाण्याचं वाण! 246,449,914 Views घेणारं ‘ईकस केसावर फुगे’ पाहिलंत?

Desi Jugaad : टाकाऊ ड्रमपासून बनवलं वॉशिंग मशीन; यूझर्स म्हणतायत, भलेभले इंजिनिअर्सही होतील नापास!